मेळाव्यात ५०० जणांनी काढले बँक खाते
By Admin | Updated: August 31, 2014 01:10 IST2014-08-31T00:53:02+5:302014-08-31T01:10:09+5:30
उदगीर/जळकोट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जन-धन योजनेला गुरुवारी जळकोटमधून प्रारंभ करण्यात आला़

मेळाव्यात ५०० जणांनी काढले बँक खाते
उदगीर/जळकोट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जन-धन योजनेला गुरुवारी जळकोटमधून प्रारंभ करण्यात आला़ येथील हैद्राबाद बँकेने शिबीर घेऊन २२० आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे विनाशुल्क खाते उघडले़
जळकोटमध्ये बँकिंग व्यवहाराशी जोडणाऱ्या जन-धन योजनेला प्रारंभ करण्यात आला़ येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेने यासंदर्भात शिबीर घेतले़ अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामराव सोनटक्के होते़ व्यवस्थापक भुजंगराव पाटील, उपव्यवस्थापक पियुष, प्रवीण गवरे, अजय मंडल, गोपालराव, मनोज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ या योजनेंतर्गत आधार कार्डावर विनाशुल्क तीन मिनिटात खाते उघडणे, खातेदारास डेबिट कार्ड, १ लाख रुपयांचा अपघात विमा, एटीएम, मोबाईलवर बँकिंग सेवा असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले़ २२० सर्वसामान्यांचे खाते शिवराज तर्केवाड, सोपान आद्रटकर, लक्ष्मण गायकवाड, सारिका पवार, माधव पवार, मारोती गायकवाड यांनी काढून दिले़(वार्ताहर)
डोंगरशेळकी जन-धन योजनेंतर्गत युनियन बँक आॅफ इंडियाने उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकीत शिबीर घेतले़ याठिकाणी एकाच दिवसात २५० बचत खाते उघडण्यात आले़ खातेधारकांना लगेचच शाखा व्यवस्थापक सुनिल कुमार, चंद्रशेखर, केशवराव मुंडे यांच्या हस्ते पासबुक व डेबिट कार्डाचे वितरण करण्यात आले़
उदगीर येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेने तीन दिवसांत उदगीर शहरातील ५०० नागरिकांचे खाते उघडून दिले़ खातेधारकांना वार्ड क्रमांक ३ मध्ये जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या हस्ते पासबुक वितरीत करण्यात आले़ यावेळी गटविकास अधिकारी डी़बी़ गिरी, मुख्य व्यवस्थापक रविंद्र कोथळीकर, प्रमोद निनावे, जयंत डांगे, नगरसेवक साबेर पटेल, राहूल अंबेसंगे, किशोर कांबळे, वसंत म्हेत्रे यांची उपस्थिती होती़