शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:59 IST

बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत.

- प्रवीण जंजाळकन्नड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभांच्या योजनेतून गेल्या ४ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या जवळपास ५०० संचिका गहाळ झाल्या असून, संगणकातील डेटाही डिलीट झाला आहे. त्यामुळे बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्षलागवड आदी योजनांचा समावेश आहे. ४ वर्षांपूर्वी तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्षलागवड आदी योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर संबधित शेतकऱ्यांनी आज ना उद्या निधी मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी उसनवारीने व व्याजाने पैसे उभारून कामही केले; परंतु त्यांना या कामांसाठी शासनाकडून देण्यात येणारा मिळाला नाही. या कामांचे प्रस्ताव ऑनलाइन करण्यात आले होते. या शेतकऱ्यांकडून निधीसाठी गेल्या काही दिवसांपासून तगादा सुरू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी मंजुरीच्या हस्तलिखित मूळ संचिकांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर संगणकावर शोध घेतला असता त्यातील डेटाही डिलीट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचे आदेश (FTO) देणे अशक्य झाले नाही. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

१० हजार कामांना निधीची मागणीच नाहीतालुक्यात रोहयोंतर्गत सिंचन विहीर, गाय गोठे, पाणंद रस्ते व वृक्षलागवडची एकूण १ हजार २५१ कामे मंजूर असून, त्यातील ७ हजार ७५४ कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. त्यातील फक्त १ हजार ८३० कामांच्या निधीचीच मागणी पंचायत समितीने केली आहे. त्यामुळे तब्बल १० हजार ४२१ कामांसाठी निधी का मागितला गेला नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कामाचे नाव, मंजूर कामे, सुरू झालेली कामे, निधी मागणी केलेली कामेसिंचन विहिरीसाठी : मंजूर कामे - ५९१५, सुरू झालेली - ३१९७, निधी मागणी - ७००गाय गोठे : मंजूर कामे - ५१४०, सुरू - ३८३५, निधी मागणी - १०५०वृक्षलागवड : मंजूर - ७३८, सुरू - ४३५, निधी मागणी - ५०पाणंद रस्ते : मंजूर - ४५८, सुरू - २८७, निधी मागणी - ३०

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpanchayat samitiपंचायत समिती