३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात ५०० रुग्ण
By Admin | Updated: May 25, 2015 00:29 IST2015-05-24T23:54:12+5:302015-05-25T00:29:36+5:30
बीड : गोर-गरीब रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची घटनात्मक जबाबदारी शासनाबरोबरच प्रशासनाची देखील आहे.

३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात ५०० रुग्ण
बीड : गोर-गरीब रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची घटनात्मक जबाबदारी शासनाबरोबरच प्रशासनाची देखील आहे. मात्र खाटांचा अभाव असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात सव्वातिनशेच्या जवळपास खाटांची संख्या आहे. खाटा कमी असल्या तरी दरदिवशी पाचशेच्या जवळपास रूग्ण दाखल होतात. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला दाखल करून घ्यावेच लागते. खाटा कमी व रूग्ण जास्त अशी स्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाची देखील आरोग्य सेवा देता-देता दमछाक होते. असे, सूत्रांनी सांगितले.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण दाखल
जिल्हा रुग्णालयातील डिलेवरी वॉर्डची क्षमता ६० ते ६५ रूग्णांची आहे. मात्र या वार्डमध्ये सव्वाशे ते दीडशेच्या जवळपास डिलेवरीचे ‘पेशन्ट’ दाखल होतात. मुलभूत सुविधा व दाखल होणारे रुग्ण यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने रूग्णालय प्रशासन, कर्मचारी यांना कामापेक्षा डोकेदुखीच जास्त होते. यातून पुन्हा आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. (प्रतिनिधी)
जागतीक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार प्रत्येक तीन रूग्णाच्या मागे एक परिचारीका असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात एका परिचारीकेला एक वॉर्ड संभाळावा लागत असल्याचे चित्र येथील जिल्हा रूग्णालयात अनेकवेळा पहावयास मिळते.
येथील जिल्हा रूग्णालयात उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही असे आरोप यापूर्वी अनेकवेळा झालेले आहेत. परिणामी प्रशासनाला सतत रूग्णांच्या नातेवाईकाच्या रोषाला सामोरे जावे लागते, परंतु याच्या मुळाशी जाऊन उत्तम अरोग्य सेवा रूग्णाना देण्याच्या बाबतीत कोणीच विशेष प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत नाही.