शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:29 IST

अपोलो ११ या अवकाशयानाने फ्लोरिडातील केप केनेडी स्पेस सेंटर येथून १६ जुलै १९६९ रोजी चंद्राच्या दिशेने झेप घेतली.

अपोलो ११. चंद्राचे द्वार माणसाला खुले करून देणारी मोहीम! अंतराळातील इतर ग्रहावर प्रथमच माणसाचे पाऊल पडले. अवघ्या विश्वाने ही ऐतिहासिक घटना डोळ्यात साठवली. चंद्रावर अमेरिकेचा ध्वज फडकावून नील आर्मस्ट्राँग, एडविन अल्ड्रिन सुखरूप पृथ्वीवर परतले. २० जुलै १९६९ रोजी हे यान चंद्रावर पोहोचले. तब्बल सहा तासांनंतर म्हणजे २१ जुलैच्या पहाटे आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. 

अपोलो ११ या अवकाशयानाने फ्लोरिडातील केप केनेडी स्पेस सेंटर येथून १६ जुलै १९६९ रोजी चंद्राच्या दिशेने झेप घेतली. दोन तास ३३ मिनिटे हे यान पृथ्वीच्या कक्षेत होते. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडण्यासाठी यानाला लागणाºया वेगासाठी एस-आयव्हीबी इंजिन पुन्हा प्रज्वलित करण्यात आले. केनेडी स्पेस सेंटरमधून नील आर्मस्ट्राँग, एडविन अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तिघांसह ‘अपोलो ११’ हे अवकाशयान १६ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. हे अवकाशयान उड्डाणानंतर १९ जुलै रोजी चंद्राच्या कक्षेत फिरू लागले.

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन अ‍ॅल्ड्रिन चंद्रावर उतरणाºया ‘ईगल’मध्ये बसले आणि हे ईगल मूळ यानापासून वेगळे झाले. यानात तिसरा अंतराळवीर कॉलिन्स थांबून होता आणि हे यान पृथ्वीप्रदक्षिणा करीत होते. तब्बल दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी आॅफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर उतरले. त्यानंतर सुमारे सहा तासांनी म्हणजे २१ जुलैच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास ‘ईगल’चा दरवाजा उघडून शिडीच्या पायºया उतरून नील आर्मस्ट्राँगचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्याच्या पायाचे ठसेही चंद्रावर उमटले. त्यानंतर १९ मिनिटांनी अ‍ॅल्ड्रिनही आर्मस्ट्राँगला येऊन मिळाला. दोघांनी फोटो काढले. चंद्रावरील पृष्ठभागाचे नमुने घेतले आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज चंद्रावर रोवला. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचार्ड निक्सन यांच्याशी हॉस्टन केंद्राच्या माध्यमातून दोघांनी संपर्कही साधला. दोघांनी २२ तास चंद्रावर घालविले. नंतर ‘ईगल’मधून त्यांनी अवकाशयानाकडे कूच केली. अवकाशयानात पोहोचताच ‘ईगल’ला सोडून कॉलिन्ससह तिघांनीही पृथ्वीकडे झेप घेतली. ११ हजार ३२ मीटर प्रति सेकंद या वेगाने हे यान पृथ्वीच्या कक्षेत आले आणि एक इतिहास रचत अलगद प्रशांत महासागरात उतरले. 

चंद्राबाबत...चंद्र कक्षेत प्रवेशफ्रँक बोरमन (१९२८) अपोलो ८विलियम ए. अँडर्स (१९३३) अपोलो ८जेम्स ए. लोव्हेल (ज्यू.) (१९२८) अपोलो ८, अपोलो १३थॉमस स्टेफर्ड (१९३०) अपोलो १०मायकेल कॉलिन्स (१९३०) अपोलो ११रिचार्ड एफ. गोर्डन (ज्यू.) (१९२९-२०१७) अपोलो १२फ्रेड डब्ल्यू. हेज (ज्यू.) (१९३३) अपोलो १३जॉन एल. स्वीगर्ट (ज्यू.) (१९३१-१९८२) अपोलो १३स्ट्यूअर्ट ए. रुसा (१९३३-१९९४) अपोलो १४अल्फ्रेड एम. वॉर्डन (१९३२) अपोलो १५थॉमस के. मॅटिंगली सेकंड (१९३६) अपोलो १६रोनाल्ड ई. इव्हान्स (१९३३-१९९०) अपोलो १७

टॅग्स :NASAनासा