मराठवाड्याला दमनगंगेचे ५० टीएमसी पाणी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST2017-09-18T00:38:03+5:302017-09-18T00:38:03+5:30
दमनगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाड्याला दमनगंगेचे ५० टीएमसी पाणी देऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोºयातून मिळविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून दमनगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
केंद्र शासनाच्या कॅबिनेटसमोर प्रस्ताव मंजूर होताच मराठवाड्याला दमनगंगेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गोदावरी पात्रात येणाºया त्या पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभ येथे हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील धरणांच्या कामांना चालना देण्यात येत आहे. विभागाचा विकास करणे ही राज्य शासनाची भूमिका आहे. हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. या ग्रीडमुळे मराठवाड्यातील उद्योग, तसेच शेतीला मोठा फायदा होईल.
डीएमआयसीतील आॅरिक सिटीमुळे सुमारे ३ लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. विभागात अन्न सुरक्षा योजनेत ४० लाख कुटुंबे पात्र ठरली. पंतप्रधान पीक विमा योजनेत ६२ लाख ३६ हजार शेतकºयांनी सहभाग घेतला. त्यातील ५३ लाख शेतकरी मराठवाड्यातील आहेत. पीक विमा योजनेत ८० टक्के शेतकºयांनी सहभाग घेतला. मराठवाडा पीक विम्यात पुढे आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकºयांनी नोंदणी केली आहे. आता संघर्ष विकासासाठी करायचा आहे. गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, कर्जमुक्तीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.