५० % कर्मचार्यांवरच चालतोय कारभार !
By Admin | Updated: May 29, 2014 00:28 IST2014-05-29T00:16:21+5:302014-05-29T00:28:42+5:30
लोहारा : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून ३५ पदे मंजूर असताना ३१ पदे भरली गेली.

५० % कर्मचार्यांवरच चालतोय कारभार !
लोहारा : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून ३५ पदे मंजूर असताना ३१ पदे भरली गेली. परंतु, यापैैकी सातजण निलंबित आहेत. चार जागा रिक्त तर एकजण रजेवर गेल्यामुळे उर्वरित १९ जणांवर तहसीलचा कारभार चालू आहे. लोहारा तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची तीन पदे मंजूर असताना दोनच भरली गेली. अव्वल कारकूनची चारही पदे भरली गेली. यापैैकी एकाविरूद्ध चार दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई झाली आहे. तर अन्य एकजण प्रतिनियुक्तीवर असल्याने सध्या दोघेजणच कार्यरत आहेत. लिपीकाची आठ पदे मंजूर असताना सहा भरली गेली. त्यातील दोन पदे रिक्त तर दोघेजण चार दिवसापूर्वी निलंबित झाले. त्यामुळे आजघडीला अख्ख्या कार्यालयात दोनच लिपीक कार्यरत आहेत. तीन मंडळ अधिकार्यांची पदे मंजूर असून, यातील एकाची उमरगा येथे बदली झाली आहे. वाळू प्रकरणी . दोघेजण निलंबित झाले. त्यामुळे सध्या या कार्यालयाचा कारभार मंडळ अधिकार्याशिवाय सुरू आहे. तलाठ्याची १७ पदे मंजूर असून, १६ भरली गेली. एक जागा रिक्त आहे. तसेच १६ पैकी दोघेजण निलंबित झाले. त्यामुळे आता १४ तलाठ्यांच्या खांद्यावर ४७ गावांचा कारभार आला आहे. (वार्ताहर) कोतवाल कार्यालयात लोहारा तालुक्यात काही प्रमाणात असलेले कोतवाल हे तहसील कार्यालयातच कोणत्या ना कोणत्या विभागाचे काम करताना दिसतात. अशीच परिस्थिती शिपायाची आहे. नेमून दिलेली कामे सोडून दुसरीच कामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तहसीलमध्ये गर्दी सध्या तहसील कार्यालयात नागरिक आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी लागणारी विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. अपुर्या कर्मचार्यांमुळे कामे वेळेत होत नसल्याने लोकांतून ओरड होत आहे. लेखा विभाग तलाठ्याकडे ! तहसील कार्यालयातील महत्वाचा विभाग म्हणजे लेखा विभाग. या विभागातून तहसीलदारासह सर्व कर्मचार्यांच्या पगारी, अनुदान आदींचा लेखाजोखा या विभागात होतो. हा कार्यभार एम.जी. जाधव यांच्याकडे होता.परंतु, त्यांची बदली उमरगा तहसील कार्यालयाला झाली. त्यामुळे गेले दोन ते तीन महिन्यापासून लेखा विभागाचा कारभार तलाठी व्ही.बी. कोळी हे पाहत आहेत. कर्मचारी हैराण गेले महिनाभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कोण ना कोण निलंबित होत आहे. निलंबित होणार्यांमध्ये अधिकार्यांपेक्षा कर्मचारीही अधिक आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचार्यांवर त्यांच्या कामाचा अतिरिक्त भार हा राहिलेल्या कर्मचार्यांवर पडला आहे. त्यामुळे संचिका निकाली निघण्यास विलंब होवू लागला आहे. सध्या या कार्यालयात प्रभारीराज सुरू आहे.