वीज बिलात ५० टक्के सवलत
By Admin | Updated: July 1, 2014 00:13 IST2014-07-01T00:06:56+5:302014-07-01T00:13:11+5:30
कळमनुरी : कृषी ग्राहकांकडील वीज बील थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत देणारी कृषी संजीवनी योजना महावितरणने कार्यान्वित केली आहे. या योजनेची तालुक्यात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

वीज बिलात ५० टक्के सवलत
कळमनुरी : कृषी ग्राहकांकडील वीज बील थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत देणारी कृषी संजीवनी योजना महावितरणने कार्यान्वित केली आहे. या योजनेची तालुक्यात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी ही योजना सुरू कण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतची मुळ थकबाकी ५० टक्के रक्कम एकरकमी तीन हप्त्यात भरल्यास ५० टक्के रकमेची सवलत दिली जाणार आहे. तालुक्यात १० हजार ५०० थकबाकीदार कृषी ग्राहक असून, त्यांच्याकडे १४ कोटींच्या जवळपास रक्कम थकीत आहे. शेतकऱ्यांनी थकबाकी रकमेची ५० टक्के रक्कम भरल्यास ५० टक्के रक्कम महाराष्ट्र शासन महावितरणकडे विद्युत कायदा २००३ कलम ६५ नुसार भरणार आहे. ३१ मार्चपर्यंतचे सर्व व्याज व दंड महावितरण माफ करणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत कमीत कमी २० टक्के रक्कम, ३० सप्टेंबरपर्यंत २० टक्के तर ३१ आॅक्टोबरपर्यंत उर्वरित १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.
या योजनेत सहभाग घेणाऱ्या थकीत वीज ग्राहकांना १ एप्रिलपर्यंतचे चालू महिन्याचे बील पूर्णपणे व नियमित भरणा करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत कृषी ग्राहक थकबाकीदार नसतील तर अशा ग्राहकांची पुढील दोन त्रैमासिक ५० टक्के बील माफ कण्यात येणार आहे. ज्या कृषी ग्राहकांनी या योजनेत भाग घेतला नसेल तर पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल व ही रक्कम महावितरण नियमाप्रमाणे वसूल करणार आहे. महावितरणचे क्षेत्रिय अधिकारी या योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन महावितरणचे एस.आर. खेत्रे यांनी केले आहे. (वार्ताहर)