छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी गावात वास्तव्यास असणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांच्या 'लखन' या खिल्लारी बैलानं देशभरात कौतुकाची थाप मिळवली आहे. तीन ते चार वर्षात एखाद्यानं किती पैसे कमावले असतील असा प्रश्न विचारल्यावर २०-२५ लाख सर्वसामान्य उत्तर मिळेल, मात्र जिल्ह्यातील पाच वर्षाच्या 'लखन'नं तब्बल सव्वकोटीहून अधिक पैसे मिळवले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचबरोबर एक फॉरचुनर, तीन बुलेट दुचाकीसह तेरा अन्य दुचाकींची कमाई त्यानं केली.
सोशल मीडियावर त्याचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. मात्र हा कोणी मुलगा नाही तर मनोहर चव्हाण यांचा 'खिल्लारी बैल' आहे. त्यानं चार वेळा 'हिंदकेसरी' शर्यत जिंकली आहे, शिवाय नोहेंबर महिन्यात देशातील सर्वात मोठी असलेली 'श्रीनाथ केसरी बैलगाडा' शर्यत शिकून सर्वत्र कौतुकाची थाप मिळवली आहे. या पैलवान बैलाला सांभाळण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागत असून त्यासाठी रोजचा पर्याय किमान पाच हजारांचा खर्च करावा लागत असल्याचं मनोहर चव्हाण यांनी दिली.
करोडी येथील चव्हाण कुटुंबियांमध्ये गेल्या चार पिढ्यांपासून बैलगाडा शर्यतीत बैल जोडी उतरवण्याची परंपरा आहे. त्यांच्याकडे जवळपास पन्नास गाईंचं पालनपोषण केलं जातं. साडेतीन वर्षांपूर्वी 'लखन' या खिल्लारी बैलाला जालना जिल्ह्यातील कार्ला गावातून साडेबारा लाखांमध्ये विकत घेतलं होतं. बैलगाडा शर्यतीत धावण्यासाठी त्याला तयार करण्यात आलं, त्यासाठी एक व्यक्ती चोवीस तास 'लखन' सोबत तैनात करण्यात आला.
लखन'नं आजपर्यंत शंभरहून अधिक स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे, मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धेत देखील तो अव्वल राहिला. त्याला सक्षम करण्यासाठी आहार चांगला द्यावा लागत असल्याची माहिती मनोहर चव्हाण यांनी दिली. सकाळ संध्याकाळ पाच पाच लिटर दूध त्याला पाजलं जातं, पंधरा प्रकाराचा सुका मेवा वापरुन लाडू तयार करुन गावरान तुपामध्ये भिजवून त्याला खाद्य दिलं जातं. त्याच बरोबर गावरान अंडी देखील आहारात समाविष्ट करावी लागतात. दर दोन दिवसाला त्याला पळण्याचा सराव तर काही वेळा पाण्यात पोहण्याचा सराव देऊन शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. 'लखन'चा रुबाब इतका असतो की त्याला खाली बसताना देखील त्याला गादी लागते. त्याशिवाय तो बसत नसल्याचं मनोहर चव्हाण यांनी सांगितलं.
'लखन' 1197 म्हणून सर्वत्र ओळख : प्रत्येकाचा एक शुभ अंक असतो तसा 'लखन' बैलाचा देखील 1197 हा शुभ अंक आहे. ज्यावेळी याच क्रमांकावर तो शर्यतीत उतरला तो अव्वल आला, तेव्हा पासून हा क्रमांक त्याचा सुभांक म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रत्येक पर्धेत हाच क्रमांक घेऊन तो सहभाग घेऊ लागला आणि जिंकू देखील लागला. त्यानं स्पर्धेत जिंकलेल्या वाहनांना चव्हाण कुटुंबीयांनी हाच पसंती क्रमांक घेतला. कुटुंबीयांकडे असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना हाच क्रमांक घेण्यात आला. इतकंच नव्हे तर सर्व सामन्यांप्रमाणे त्याचं इंस्टाग्राम अकाउंट सुरु करण्यात आलं, त्याला 'lakhan 1197' असं नाव देण्यात आलं असून जवळपास त्याचे 27 हजार फॉलोवर्स आहेत.
Web Summary : Lakhan, a five-year-old bull, has earned over ₹1.25 crore and numerous vehicles through bullock cart racing. The bull's diet includes milk, dry fruits, and eggs. He also has a dedicated social media following.
Web Summary : पांच वर्षीय 'लखन' बैल ने बैलगाड़ी दौड़ के माध्यम से ₹1.25 करोड़ से अधिक और कई वाहन जीते। बैल के आहार में दूध, सूखे मेवे और अंडे शामिल हैं। सोशल मीडिया पर भी उसके प्रशंसक हैं।