शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
3
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
4
वैष्णोदेवीला जाणाऱ्यांवर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानी खेळाडूने केला निषेध, म्हणाला...
5
सूड उगविण्यासाठी अभिनेत्रीनेच केले प्रवृत्त, अश्लील कमेंटमुळे दर्शन चिडला अन्..., धक्कादायक गौप्यस्फोट
6
पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर
7
विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी
8
दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी
9
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद
11
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
12
IND vs AUS : टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? IND vs AUS 'सुपर' लढत होण्याची शक्यता
13
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
14
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
15
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
16
लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...
17
video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...
18
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
19
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका
20
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम

पहिल्या फेरीत ५ हजार विद्यार्थ्यांनीच घेतला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:18 AM

अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.५ जुलै रोजी जाहीर झालेल्या पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत ६ ते ९ जुलैपर्यंत देण्यात आली होती. आता राज्य सरकारने या पहिल्या फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ दिली. मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने अकरावी प्रवेशाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीत जाहीर ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर ४ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, असे विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पसंती देऊ शकतात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक मधुकर देशमुख यांनी दिली. महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी असून, त्यासाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनीच आॅनलाईन अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. यातच पहिल्या फेरीतही कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे रिक्त जागांचा आकडा पंधरा हजारांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र