५ हजार सेवानिवृत्तांना मिळणार वाढ
By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:32:28+5:302014-06-30T00:39:59+5:30
जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

५ हजार सेवानिवृत्तांना मिळणार वाढ
जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर निवृत्तीवेतनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह इतर राज्य सरकारच्या सर्व ८० वर्षे किंवा त्यापुढील वय असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना ही वाढ लागू राहणार आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी एक रकमी रक्कम स्वीकारलेली आहे. निवृत्ती वेतनाच्या १/३ इतका अंशराशीकृत भाग पुन:स्थापित करण्यासाठी, अंशराशिकृत रकमेच्या सुधारणेसाठी सहाव्या वेतन आयोगप्रमाणे सुधारीत निवृत्ती वेतनास पात्र ठरले आहेत, अशा ८० वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनावर १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील पाच हजारावर निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा मिळेल अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. (वार्ताहर)