पाच ठाणे अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस

By Admin | Updated: May 26, 2014 01:14 IST2014-05-26T01:00:01+5:302014-05-26T01:14:46+5:30

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे

5 Thane officials show cause notice | पाच ठाणे अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस

पाच ठाणे अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे. आयुक्तांनी पाठविलेल्या डमी तक्रारदारांना वाईट वागणूक दिलेल्या ५ ठाणे अंमलदारांना आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कारणेदर्शक नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, अंमलदारांचे वर्तन सुधारण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी कार्यशाळा घेतली होती. ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य जनतेची दखल त्यांनी तत्परतने घ्यावी, यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते; पण अंमलदारांच्या वर्तनात किंचितही सुधारणा झालेली नाही. सामान्य जनतेचे गाºहाणे ऐकूण न घेता त्यांना ताटकळत ठेवणे, तक्रारदारांचीच उलट तपासणी करणे, त्यांना दिवसभर बसवून ठेवल्यानंतर परत दुसर्‍या दिवशी बोलावणे, या गोष्टींमुळेच समाजात पोलिसांप्रति दुरावा निर्माण होत आहे. समाज व पोलिसांत सुसंवाद असावा, मैत्रीचे संबंध असावेत, यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात; पण ठाणे अंमलदारांची बोली व कृतीमुळे सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांप्रति सतत तिरस्कारच निर्माण झालेला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना जास्त वेळ ताटकळत बसवून न ठेवता त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्या तक्रारीनुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळ न दवडता तक्रार दाखल करून घ्यावी, असे पोलीस आयुक्तांचे आदेश असताना शहरातील अनेक ठाण्यांमध्ये अंमलदारांकडून तक्रारदार नागरिकांचाच छळ केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. २० मे रोजी आयुक्तांनी शहरातील ८ पोलीस ठाण्यांत डमी तक्रारदार पाठविले. तेथे क्रांतीचौक, जवाहरनगर, उस्मानपुरा, मुकुंदवाडी व एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या अंमलदारांचा डमी तक्रारदारांना अतिशय वाईट अनुभव आला. काही अंमलदारांनी तक्रारदारांना अरेरावी करीत त्यांची खरडपट्टी काढली, तर काहींनी तक्रारदारांना दुसर्‍या दिवशी येण्याचे फर्मान सोडले. सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये सौहार्दतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस दल प्रयत्नात असताना अंमलदार मात्र नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाहीत.

Web Title: 5 Thane officials show cause notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.