लातुरात आढळले डेंग्यूचे ५ रुग्ण !
By Admin | Updated: August 21, 2015 00:41 IST2015-08-21T00:34:53+5:302015-08-21T00:41:34+5:30
लातूर : डेंग्यूच्या आजाराने लातूर शहरात डोके वर काढले असून, १९ संशयित रुग्णांपैकी ५ जणांना डेंग्यू झाल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.

लातुरात आढळले डेंग्यूचे ५ रुग्ण !
लातूर : डेंग्यूच्या आजाराने लातूर शहरात डोके वर काढले असून, १९ संशयित रुग्णांपैकी ५ जणांना डेंग्यू झाल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. दरम्यान, या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.
लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून तापीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. खाजगी बाल रुग्णालयांमध्ये तापीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा एकूण १९ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी पाच रुग्णांच्या रक्त नमुन्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने हे रुग्ण ज्या भागातील आहेत, त्या भागातील तापीच्या रुग्णांची माहिती घेणे सुरू केले असून, डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी अॅबेटिंग मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)