‘त्या’ कुटुंबाला ५ लाखांची मदत

By Admin | Updated: October 27, 2016 00:56 IST2016-10-27T00:44:19+5:302016-10-27T00:56:44+5:30

औरंगाबाद : ड्रेनेज लाईनची सफाई करताना चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या मजुराची पत्नी उषा घुले हिला मनपातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवारी करण्यात आली.

5 lakhs of help to 'that' family | ‘त्या’ कुटुंबाला ५ लाखांची मदत

‘त्या’ कुटुंबाला ५ लाखांची मदत


औरंगाबाद : ड्रेनेज लाईनची सफाई करताना चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या मजुराची पत्नी उषा घुले हिला मनपातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवारी करण्यात आली. ३ लाख रुपये आरोही प्रदीप घुले या तीनवर्षीय चिमुकलीच्या नावाने १८ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहेत.
ड्रेनेजचे काम करताना गंभीर जखमी झालेल्या शेख अकबर या मजुराला ५० हजार रुपये दवाखान्याचा खर्च आणि १ लाख ३३ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते चेक देण्यात आला. यावेळी मोहन मेघावाले, राजेंद्र जंजाळ, अय्युब जहागीरदार, बापू घडामोडे, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.

Web Title: 5 lakhs of help to 'that' family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.