किसान सन्मान योजनेतील ५२ बोगस लाभार्थ्यांकडून ५ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 07:45 PM2020-10-12T19:45:16+5:302020-10-12T19:47:05+5:30

5 lakh paid by 52 bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी झाली

5 lakh recovered from 52 bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana | किसान सन्मान योजनेतील ५२ बोगस लाभार्थ्यांकडून ५ लाख वसूल

किसान सन्मान योजनेतील ५२ बोगस लाभार्थ्यांकडून ५ लाख वसूल

googlenewsNext
ठळक मुद्देगैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीस५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे.

सोयगाव: किसान सन्मान योजनेत अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या ४०१ शेतकऱ्यांना शासनाने नोटीस बजावली होती. सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावातील अशा बोगस लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली सुनावणी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. यामध्ये नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी घेवून फेरतपासणी करण्यात आली. सोयगाव मंडळातील नोटीसा बजावलेले सर्व ८२ शेतकरी अपात्र ठरले. या शेतकऱ्यांनी उचलेल्या ७ लक्ष ६९ हजार इतक्या लाभापैकी ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम ५२ लाभार्थ्यांनी भरणा केली आहे. पहिल्याच सुनावणीत ३० शेतकरी गैरहजर राहिले आहेत. शासनाच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.

किसान सन्मान योजनेत चुकीची माहिती भरून करदाते आणि पती-पत्नी या लाभार्थ्यांनी बोगस लाभ घेत असल्याचे शासनाच्या अंतिम सर्वेक्षणात उघड झाले होते. त्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात ४०१ शेतकऱ्यांनी खोटा लाभ उच्झाल केल्याचे निष्पन्न झाल्यावरून सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावांच्या लाभार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत ८२ पैकी ५२ शेतकरी हजर राहिल्याने या ५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या किसान सन्मान योजनेच्या सुनावणीसाठी करदाते यांनाच सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.

गैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीस
सोयगाव मंडळातील सुनावणीत गैरहजर राहिलेल्या ३० शेतकऱ्यांना पुन्हा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली. सोमवारी झालेल्या सुनावणीत कागदपत्रांच्या फेरतपासणीत चुकून एकही अपात्र ठरलेला लाभार्थी पात्र ठरला नव्हता त्यामुळे ५२ लाभार्थी अपात्रच असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

बोगस शेतकरी योजनेतून बाद
सोयगाव तहसील कार्यालयात झालेल्या किसान सन्मान योजनेच्या पहिल्याच सुनावणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याने रक्कमेचा भरणा करताच त्याची भरणा केलेली पावती घेवून योजनेच्या संकेतस्थळावर पुन्हा अपलोड करून या बोगस लाभार्थ्यांना योजनेतूनच बाद करण्यात आले आहे.त्यामुळे किसान सन्मान योजनेचा पुढील हप्त्याची रक्कम यापुढे या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नसल्याची रननीती या सुनावणीत आखण्यात आली होती.

Web Title: 5 lakh recovered from 52 bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.