कृषी विभाग लावणार ५ लाख झाडे
By Admin | Updated: July 1, 2014 00:38 IST2014-07-01T00:33:45+5:302014-07-01T00:38:24+5:30
नांदेड : जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाच्या वतीने ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

कृषी विभाग लावणार ५ लाख झाडे
नांदेड : जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाच्या वतीने ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असून तालुकानिहाय लागवडीचे उदिष्ट दिल्यामुळे सर्वच तालुक्यांचे कृषी कार्यालये या कामासाठी सज्ज झाले आहेत.
शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत सन २०१४-१५ साठी सर्व तालुक्यातील मंडळनिहाय दिलेले उदिष्ट असे- नांदेड तालुका- मंडळ २, वृक्ष लागवडीचे उदिष्ट ३२०००, अर्धापूर-मंडळांची संख्या १, उदिष्ट १८०००, मुदखेड- मंडळ १, उदिष्ट १८०००, लोहा- मंडळ ३, उदिष्ट ४८०००, कंधार-३, ४८०००, देगलूर-३, ४८०००, मुखेड-३, ४८०००, नायगांव-१, १८०००, बिलोली-२, ३०,०००, धर्माबाद-१, १८०००, किनवट-३, ४५०००, माहूर-१, १८०००, हदगांव-३, ४५०००, हिमायतनगर-१, १८०००, भोकर-२, १८०००, उमरी-१, १८००० याप्रमाणे जिल्ह्यातील ३१ मंडळामार्फत ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.
सदर योजनेतंर्गत झाडे लावून पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. झाडांची लागवड रस्ते, शेतीच्या बांधावर, शाळा परिसर, क्रिंडांगण, तसेच ग्रामपंचायत परिसर याशिवाय शेतकरी तसेच ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर झाडे लावायची आहेत.
दरवर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत झाडे लावली जातात, परंतु त्याचे संगोपन केले जात नाही, यामुळे ही योजना वर्षानुवर्षे राबवूनही लावलेली रोपटे जगत नाहीत. परिणामी पर्यावरणावर शासन तसेच संघटनांना दरवर्षी जनजागृती करण्याची वेळ पडते. यासाठी प्रत्येकांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून झाडांची तोड न करता संगोपण करावे. (प्रतिनिधी)
६००० हजार खड्डे तयार
पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संस्था, सामाजिक वनिकरण व झरी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपनासाठी सहा हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत़
झरी श्रमतलाव ते झरी गाव, रत्नेश्वर डोंगर पर्यंतच्या रस्त्यावर वृक्षारोपन करण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांकडून परिश्रम घेण्यात येत आहेत़