५ लाख ८२ हजार कुटुंब शेतीवरच

By Admin | Updated: May 29, 2014 00:52 IST2014-05-29T00:50:46+5:302014-05-29T00:52:47+5:30

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़

5 lakh 82 thousand families on the farm | ५ लाख ८२ हजार कुटुंब शेतीवरच

५ लाख ८२ हजार कुटुंब शेतीवरच

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़ आजही जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना त्यातील फक्त १०६८ शेतकरी बहूभूधारक असल्याचे समोर आले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या वाढली़ त्यामुळे हिश्श्याला आलेल्या जमिनीच्या तुकड्यावर गुजरान करणे जिकिरीचे झाले़ त्याचा परिणाम म्हणून शेतीवर अवलंबून असलेली कुटुंब जमिनीचा तुकडा विकून व्यवसायासाठी शहराकडे धाव घेत आहेत़ तर काहींनी मध्यम मार्ग काढत शेतीला व्यवसायाची जोड दिली आहे़ शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसायाची गरज निसर्गाने कृपा केली तर पिकते, मात्र निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकर्‍यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे बँकेकडून घेतलेले कर्जही फेडणे कठीण जाते. परिणामी शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. यासाठी शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसाय तसेच शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन कसे काढता येईल, यावर भर देण्यासाठी योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होतील. १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी अत्यल्प भूधारक या वर्गवारीमध्ये येतात. तर १ ते ५ हेक्टर जमीन असलेले शेतकरी अल्पभूधारक तर ५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी बहूभूधारक शेतकरी गणले जातात. यामुळे गत काही वर्षात जिल्ह्यातील बहूभूधारक शेतकर्‍यांच्या संख्येत घट झाली. त्या तुलनेत जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली नसल्याने अत्यल्पभूधारकांचे प्रमाण वाढले आहे. अल्पभूधारक कुटुंबपद्धती अस्तित्वात लहान कुटुंबामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे २०१०- या वर्षात केलेल्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या संख्येमध्ये वाढ झाली,परंतु अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले. दहा वर्षांत ८२ हजार शेतकरीसंख्येत वाढ जिल्ह्यात गत दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००२-१ मध्ये अत्यल्प भूधारकांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ एवढी होती. तर लहान १ लाख ७६ हजार ५३९ तर मध्यम लहान १ लाख २७०४ तर मध्यम शेतकर्‍यांची संख्या २५३३४ तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ एवढी होती. सर्वसाधारणपणे अत्यल्प शेतकर्‍यांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ तर अल्प शेतकर्‍यांची संख्या २ लाख ७४ हजार ५७७ एवढी तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ अशी ५ लाख ३०६ एवढी होती. दहा वर्षापूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती, मात्र आता शिक्षण, नोकरी यामुळे कुटुंबांचे विभक्तीकरण होत आहे. याचा परिणाम संयुक्त कुटुंंबपद्धती बोटावर मोजण्याइतपत कुटुंबांमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५ लाख ८२ हजार २०० शेतकरी कुटुंंबाची संख्या आहे. यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांची संख्या २ लाख ४९ हजार ११२ एवढी आहे. तर लहान २ लाख ११२३२, मध्यम लहान १ लाख २१८ तर मध्यम २०५७० असे मिळून अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ३२ हजार २० एवढी आहे. तर बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या केवळ १०६८ आहे.

Web Title: 5 lakh 82 thousand families on the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.