५ कोटी ८० लाखांचा निधी घरकुलांसाठी

By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-25T23:46:37+5:302014-07-26T00:42:15+5:30

हिंगोली : इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत केंद्र शासनाने राज्य शासनाला पहिल्या हफ्त्याचा निधी वितरीत केला आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याला ५ कोटी ८० लाख ३८ हजार ८०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

5 crores 80 lacs for the houses | ५ कोटी ८० लाखांचा निधी घरकुलांसाठी

५ कोटी ८० लाखांचा निधी घरकुलांसाठी

हिंगोली : इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत केंद्र शासनाने राज्य शासनाला पहिल्या हफ्त्याचा निधी वितरीत केला आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याला ५ कोटी ८० लाख ३८ हजार ८०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात इंदिरा आवास घरकुल योजना राबविण्यात येते. त्या अंतर्गत विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी केंद्र शासनाने राज्याला एकूण १२७ कोटी ४२ लाख ६० हजार ३०० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी ५ कोटी ८० लाख ३८ हजार ८०० रुपयांच्या निधींचा समावेश आहे.
हा निधी विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी देण्यात आला आहे. आता निधी उपलब्ध झाल्याने या घरकुलांच्या कामांना वेग येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 5 crores 80 lacs for the houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.