शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प

By मुजीब देवणीकर | Updated: April 1, 2023 20:17 IST

तीन हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महापालिकेचे पुन्हा ७३८ कोटींच्या विकासकामांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत सलग तिसऱ्या वर्षीही कारभारी नसल्याने अर्थसंकल्प सादर करणे आणि तो लगेच मंजूर करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली. शुक्रवारी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी २०२३-२४ या वर्षासाठी ३ हजार ८१ कोटी ८९ लाख १२ हजार रुपये जमा तर ३ हजार ८० कोटी ७२ लाख ८५ हजार खर्च असे १ कोटी १६ लाख २७ हजार रुपये शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर केले. अर्थसंकल्पात तब्बल ७३८ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचे आश्वासन देण्यात आले. त्यात २९३ कोटी ५० लाख रुपयांचे स्पील (मागील वर्षी न झालेली कामे) आहेत. दीड हजार कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतील, उर्वरित निधी अनुदानापोटी शासनाकडून मिळेल, असे गृहीत धरले.

मागील वर्षी प्रशासनाने १७२८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. वर्षअखेरीस सुधारित अर्थसंकल्प १३२५ कोटींवर आला. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक कामे झालेली नव्हती, त्यामुळे २९३ कोटी ५० लाखांची स्पीलची कामे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये टाकण्यात आली आहेत. वर्षभरात ७३८ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च देखभाल दुरुस्तीवर होणार आहे. १०० कोटींच्या रस्ते कामाची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. उत्पन्नाची बाजू सांगताना डॉ. चौधरी यांनी नमूद केले की, जीएसटीच्या अनुदानापोटी महापालिकेला शासनाकडून महिन्याला ३२ कोटी ५० लाखांचे अनुदान मिळते. वर्षभरात ३९० कोटी रुपये येतील, मुद्रांक शुल्काच्या एक टक्क्यापोटी ३५ कोटी रुपये, मालमत्ता करापोटी २०० कोटी, १५० कोटी रुपयांची थकबाकी असे ३५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठरविले आहे. हॉकर्स झोनच्या माध्यमातून ३, परवाना शुल्कापोटी ७, पे ॲण्ड पार्कमधून १.१० कोटी, १५ व्या वित्त आयोगाचे ४५ कोटी, ५५ कोटींचे विशेष अनुदान, घनकचरा व्यवस्थापनापोटी १८.३६ कोटी, नगर रचना विभागामार्फत २३५.६० कोटी, गुंठेवारी अंतर्गत ५० कोटी तसेच पाणीपट्टीची चालू मागणी ८० कोटी तर थकबाकीपोटी ५० कोटींची वसुली अपेक्षित आहे. महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न १५७४ कोटींच्या घरात असून, वर्षभरात मिळणाऱ्या शासकीय अनुदानामुळे अर्थसंकल्पाचे आकडे वाढल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, शहर अभियंता ए. बी. देशमुख, नगर रचना विभागाचे सहायक संचालक मनोज गर्जे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची उपस्थिती होती.

एमआयडीसीत उड्डाणपूलबीड बायपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील निर्लेप कंपनीजवळ उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन मनपाने अर्थसंकल्पात केले आहे. त्यासाठी लवकर डीपीआर तयार केला जाईल.

‘लोकमत’च्या वृत्ताची दखलजी-२० परिषदेच्या निमित्ताने १०० कोटी रुपये खर्च करून शहर चकाचक करण्यात आले. सौंदर्यीकरणासाठी दरवर्षी मनपाने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारी रोजी हे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी यंदा ५ कोटींची आर्थिक तरतूद पहिल्या टप्प्यात केली.

वॉर्डाला ५० लाखमागील वर्षी प्रत्येक वॉर्डासाठी १ कोटीचा विकास निधी जाहीर करण्यात आला होता. हा निधी खर्च झाला नाही. त्यामुळे यंदा ५० लाख रुपये प्रत्येक वॉर्डात विकासकामासाठी मिळणार आहेत. त्यासाठी ५७.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

६६ नवीन वर्ग खोल्यामहापालिकेच्या शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांची मागणी काही वर्षांपासून सुरू आहे. ६६ नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली. आणखी काही सीबीएसई शाळा उघडण्याचा संकल्पही करण्यात आला. बालवाडीसाठी नवीन अभ्यासक्रम, शिक्षिकांना ट्रेनिंग दिली जाईल.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये-शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यासाठी तरतूद.-महापालिका शाळेत विज्ञान साहित्य पुरविणे, लॅब, ई-लर्निंग क्लासरूमसह इतर कामांसाठी १० कोटी-दिव्यांग व्यक्तीसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी १७ कोटी-अग्निशमन विभागाचे बळकटीकरण करणे २५.२० कोटी-महिला व बालकल्याण विभागासाठी ७.२५ कोटी-मेल्ट्रॉनमध्ये रक्त संकलन केंद्रासाठी ५० लाख-मेल्ट्रॉनमध्ये एनआयसीयू केंद्राकरिता ६० लाख-अत्याधुनिक डायलिसीस सेंटर सुरू करणे १ कोटी-दिव्यांग पुनर्वसन उपचार केंद्र व सेंटर सुरू करणे ५० लाख-मध्यवर्ती निदान प्रयोगशाळेसाठी १ कोटी-रॉक्सी टॉकीजजवळील महापालिकेची जागा विकसित करणार.-दिल्लीगेट येथे अभिलेख कक्ष सुरू करणार.-जाधव मंडी बांबू गल्लीत वाहनतळ सुरू करणार.-महापालिकेची प्रशासकीय इमारत बांधण्याचा संकल्प.-यांत्रिकी विभाग १० कोटी खर्च करून विविध मशिनरी खरेदी करणार.-गरवारे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅव्हेलियन बांधणार.

असा येईल रुपया-वस्तू व सेवा कर अनुदान - ३९० कोटी- मुद्रांक शुल्क अनुदान- ३५ कोटी- मालमत्ता करवसुली- ३५० कोटी- महापालिकेच्या मालमत्तांचे भाडे- १६.५३ कोटी- १५ वा वित्त आयोग अनुदान- ४५ कोटी- विविध शासकीय अनुदान- १८४ कोटी- नगर रचना विभाग- २३५.६० कोटी- गुंठेवारी नियमितीकरण- ५० कोटी- पाणीपट्टी वसुली- १३० कोटी- शासकीय अनुदाने व खर्च प्रतिपूर्ती- ४४.७६- उद्यान व प्राणिसंग्रहालय - ५ कोटी

शासकीय अनुदानापोटी अपेक्षित निधी (आकडे कोटीत)-बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक- ९.५०-रस्ते बांधणी व मजबुतीकरण- ५५-घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी- १८.७६-१५ वित्त आयोग अनुदान- ४५-स्वच्छ भारत मिशन- २-स्वच्छ भारत मिशन सार्वजनिक स्वच्छतागृह- १.९४-अमृत-२.० योजना- ११९५.७०-अमृत-२.० सातारा देवळाई मलनिःसारण योजना- १२७-जिल्हा वार्षिक योजना- २

असा जाईल रुपया (कोटीत)-कर्मचारी वेतन व भत्ते- ३७५.९७-स्पीलसह विकासकामे- ७३८.६२-खासगी तत्त्वावरील कर्मचारी वेतन - ४०- अन्य सवलती व भत्ते- २.७०- इतर प्रशासकीय खर्च- ३.६०- यांत्रिकी विभाग- १४.४०- मध्यवर्ती भांडार विभाग- ४-संगणक विभाग- ००.८५-दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती- ३२.६४

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBudgetअर्थसंकल्प 2023Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका