सुजलेगावातील सामूहिक मेळाव्यात ५ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: April 26, 2016 23:45 IST2016-04-26T23:35:55+5:302016-04-26T23:45:29+5:30
नरसीफाटा : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील हनुमान मंदिर परिसरात कुणबी-मराठा समाजातील पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा २६ एप्रिल रोजी पार पडला़

सुजलेगावातील सामूहिक मेळाव्यात ५ जोडपी विवाहबद्ध
नरसीफाटा : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील हनुमान मंदिर परिसरात कुणबी-मराठा समाजातील पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा २६ एप्रिल रोजी पार पडला़
या कुणबी-मराठा सामुदायिक विवाह सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव पाटील भिलवंडे, नायगाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण, भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, भाजपा तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, गंगाधर भिलवंडे, मारोती मिरकुटे, मारोतराव भिलवंडे, लक्ष्मण बाराळे, बालाजी मिरकुटे, नीळकंठराव चिखले, पांडुरंग पाटील जाकोरे, राहुल पाटील बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ दिगंबर जाधव, एम़ डी़ कदम, लक्ष्मण बोरवाड, बालाजी उमाटे, गंगाधर वडजे, भाऊसाहेब मुदखेडे, रंगराव देशमुख, संतोष देशमुख, गणपत देशमुख, चंदर शिंदे, शाहीर बळीराम जाधव, बालाजी कदम, सुधाकर बकवाड यांनी पुढाकार घेवून सामूहिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली़ विवाह सोहळा यशस्वीतेसाठी भगवान शिंदे, हानमंत बोटलावार, दत्ता वडजे, नागोराव वडजे, नारायण शिंदे, दीपक जाधव, गणेश बोमलवाड, शंकर गुंतापल्ले, गणेश पाटील, मारोती कदम, अनिल इबितदार, किशनराव कंदाकुर्ते, सुभाष सज्जन, बाळू तांदळे आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)