फौजदारपदाच्या परीक्षेला ४९४ उमेदवारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 23:20 IST2017-03-12T23:18:15+5:302017-03-12T23:20:00+5:30

बीड : राज्य लोकसेवा आयोगातर्फे फौजदारपदाच्या (पूर्व परीक्षेसाठी) रविवारी शहरातील ११ उपकेंद्रांवर परीक्षा पार पडली.

494 Candidates of Dandi for Army Examination | फौजदारपदाच्या परीक्षेला ४९४ उमेदवारांची दांडी

फौजदारपदाच्या परीक्षेला ४९४ उमेदवारांची दांडी

बीड : राज्य लोकसेवा आयोगातर्फे फौजदारपदाच्या (पूर्व परीक्षेसाठी) रविवारी शहरातील ११ उपकेंद्रांवर परीक्षा पार पडली. ३७५० उमेदवारांपैकी ४९४ जणांनी परीक्षेला दांडी मारली.
सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ११ केंद्रांवर झालेल्या परीक्षेसाठी ३७५० उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ३२५६ जण उपस्थित राहिले. ४९४ जणांनी मात्र परीक्षेकडे पाठ फिरवली. सकाळी १० वाजता ठिकठिकाणच्या केंद्रांवर उमेदवारांनी गर्दी केली होती. प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र यापैकी एक पुरावा ओळखपत्र म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले होते. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर आदी साहित्य नेण्यास मज्जाव केला होता. पोलिसांनी झाडाझडती घेऊनच उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला.
केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये उमेदवारांशिवाय इतरांना प्रवेश नाकारला होता. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. परीक्षा प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके नेमली होती. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले. (प्रतिनिधी)

Web Title: 494 Candidates of Dandi for Army Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.