शाळा प्रवासासाठी ४९१ विद्यार्थ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:02 IST2021-04-04T04:02:02+5:302021-04-04T04:02:02+5:30
-- शिक्षणाचा अधिकार : पाचवी ते आठवीच्या लाभार्थींना मिळेल शाळा प्रवास खर्च औरंगाबाद : मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार ...

शाळा प्रवासासाठी ४९१ विद्यार्थ्यांना
--
शिक्षणाचा अधिकार : पाचवी ते आठवीच्या लाभार्थींना मिळेल शाळा प्रवास खर्च
औरंगाबाद : मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमांतर्गत गावात शाळा नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून ३०० रुपये दर महिन्याला देण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळेत प्रत्यक्ष वर्ग सुरूच झाले नाहीत. जानेवारी ते मार्चदरम्यान केवळ पाचवी ते आठवीचे वर्ग भरले. पुन्हा बंद झाले. या कालावधीतील पाचवी ते आठवीमध्ये या योजनेत पात्र ४९१ विद्यार्थ्यांना एका महिन्याचे ३०० रुपये शाळा प्रवासासाठीचे दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या गावांत शाळेची सुविधा नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमांतर्गत प्रवासासाठी प्रतिमाह ३०० रुपये दिले जातात. त्यासाठी अर्जप्रक्रिया आणि छाननी ऑनलाइन पद्धतीने झाली. पहिली ते चाैथीचे वर्ग सुरूच न झाल्याने त्या विद्यार्थ्यांच्या लाभार्थ्यांची निवडच झाली नसून पाचवी ते आठवीच्या वर्गातील सहा तालुक्यातील ४९१ विद्यार्थी पात्र ठरले, तर सोयगाव, फुलंब्री, कन्नडच्या लाभार्थी निवडीची यादीच मिळाली नाही. त्यांना प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेल्या एका महिन्याच्या काळाचे एक महिन्याचा प्रवासभत्ता दिला जाणार असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे सोज्वल जैन यांनी सांगितले.
----
पाचवी ते आठवीच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांना शाळा प्रवासासाठी ३०० रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर असून, तो अद्याप मिळालेला नाही. निधी मिळताच त्याचे वितरण लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल.
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद
--
कोरोनाचा बसतोय फटका
---
-पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह ३०० प्रमाणे शाळा सुरू असलेल्या दहा महिने कालावधीचे ३ हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात.
-यावर्षी कोरोनामुळे पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष भरलेच नाहीत. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांना जिथे शाळा नाही अशा लाभार्थ्यांची निवड झाली नाही.
-पाचवी ते आठवीतील ऑनलाइन निवडीत केवळ ४९१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यांनाही शाळा सुरू असलेल्या केवळ एका महिन्याचे ३०० रुपये अनुदान प्राप्त झाल्यावर मिळतील.
--
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह - ३०० रुपये
जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थी - ४९१
--
तालुका : लाभार्थी
औरंगाबाद - १
गंगापूर - १७८
खुलताबाद - ७०
पैठण - १५२
सिल्लोड - ७०
वैजापूर - २०
सोयगाव -०
फुलंब्री -०
कन्नड -०
एकूण - ४९१