शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी देतो म्हणून ४९ लाख उकळले, मंत्रालयाचे कोरे लेटर पॅडही सापडले; भामटा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:33 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली १५ बेरोजगार तरुणांची फसवणूक

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: नोकरीच्या शोधात असलेल्या १५ बेरोजगार तरुणांना तब्बल ४९ लाख रुपयांना गंडवणाऱ्या एका भामट्याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री १२ वाजता क्रांती चौकातून अटक केली. आरोपीकडे मंत्रालयातील एका खात्याचे कोरे लेटर पॅड, विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बोगस शिक्के आणि बनावट नियुक्ती पत्रे सापडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या अटकेमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिसांनी सापळा रचून पकडलेउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. पोलिसांनी एका बेरोजगार व्यक्तीला आरोपीला द्यायची बाकी असलेली ३ लाख रुपयांची रक्कम तयार असल्याचे सांगून, त्याला छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात बोलावले. पोलिसांच्या पथकाने तेथे आधीच दबा धरून बसून आरोपी भरत दिनानाथ वाहूळ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून मंत्रालयातील लेटर पॅड, बोगस शिक्के आणि नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत. मंगळवारी त्याला सिल्लोड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीतून आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्षक ते ठगआरोपी भरत वाहूळ हा आधी एका संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत होता. त्यानंतर तो भंगार गाड्यांचा व्यवसाय करू लागला. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू केला. त्याने केवळ सिल्लोड तालुक्यातीलच नव्हे, तर सातारा, जालना आणि बुलढाणा यांसारख्या विविध जिल्ह्यांतील अनेक तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शिक्के आणि सह्या वापरून लिपिक आणि शिपाई पदांसाठी बनावट नियुक्तीपत्रे दिली होती.

मोठे रॅकेट असण्याची शक्यताया प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना आरोपीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बोगस ऑर्डर कोठे तयार केल्या, शिक्के कुठे बनवले, मंत्रालयातील लेटर पॅड त्याला कसे मिळाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहे, याचा तपास सुरू आहे. जर पोलिसांनी या दिशेने सखोल तपास केला, तर आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या फसवणुकीचा बळी ठरलेल्या अनेकांनी पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी