दोन महिन्यांमध्ये ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: August 26, 2015 23:44 IST2015-08-26T23:44:21+5:302015-08-26T23:44:21+5:30
बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन महिन्यांमध्ये ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. चालू वर्षात एकूण १७६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. मागील चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. यातच जवळील चाराही संपल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये जुलै महिन्यात २५ तर आॅगस्टमध्ये २३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यंदा शेतकऱ्याने उसनवारी करून खरीप हंगामातील पेरणी केली. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने डोळ्यादेखत पिके जळून खाक झाली. उसनवारी कशी परत करायची ? या काळजीने शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबत आहेत. आता तर चारा टंचाईनेही कहर केला आहे. चारा छावण्या सुरू होतील म्हणता म्हणता आॅगस्ट महिनाही संपला आहे. (प्रतिनिधी)