सरासरीच्या ४८ टक्के पाऊस

By Admin | Updated: September 1, 2014 01:07 IST2014-09-01T00:46:48+5:302014-09-01T01:07:30+5:30

उस्मानाबाद : गत आठ दिवसांत पावसाने जिल्हाभर सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे़ जिल्ह्यात आजवर ४८़२ टक्के पाऊस झाला असून,

48% on average | सरासरीच्या ४८ टक्के पाऊस

सरासरीच्या ४८ टक्के पाऊस


उस्मानाबाद : गत आठ दिवसांत पावसाने जिल्हाभर सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे़ जिल्ह्यात आजवर ४८़२ टक्के पाऊस झाला असून, गत आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील ११ प्रकल्प पूर्णत: भरले आहेत़ तर वाशी तालुक्यात सर्वाधिक ४९०़९ मिमी पाऊस झाला आहे़
चालू वर्षी पावसाचे जवळपास दीड महिना उशिराने झाले़ त्यात सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभा राहिले होते़ यावरही मात करून शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या़ मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने जिल्ह्यावर दुष्काळाची तीव्र छटा निर्माण झाली होती़ शासनाकडून वाशी वगळता इतर तालुके टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आले होते़ मात्र, गत सात-आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे़ मागील चार दिवसात सातत्याने पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ११ साठवण तलाव पूर्णत: भरले असून, नदी, ओढे भरून वाहत असून, इतर साठवण तलावातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे़
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७६७़५ मिमी असून, आजवर सरासरी ३६९़८ मिमी (४८़२ टक्के) पाऊस झाला आहे़ (कंसातील आकडे आजवरच्या अपेक्षित पावसाचे) यात उस्मानाबाद तालुक्यात (४८६.९) ३३९़, तुळजापूर तालुक्यात (५५८़९) ३९०़, उमरगा तालुक्यात (६०३़८) ३५६़८, लोहारा तालुक्यात (६०३़८) ३२५़७, कळंब तालुक्यात (४७२़९) ३२८़८, भूम तालुक्यात (६६९़२) ३८४़६, वाशी तालुक्यात (४७२़९) ४९०़९ तर परंडा तालुक्याचा अपेक्षित पाऊस ३७१़६ मिमी असून, आजवर ३४२़८ मिमी पाऊस झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे़
मंडळनिहाय आकडेवारी
उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर मंडळांतर्गत १८ मिमी, उस्मानाबाद ग्रामीण ३१ मिमी, ढोकी ७० मिमी, तेर ३९ मिमी पाडोळी १७ मिमी, जागजी ३२ मिमी, बेंबळी २४ मिमी तर केशेगाव मंडळात २५ मिमी पाऊस झाला आहे़ कळंब तालुक्यात कळंब मंडळांतर्गत ६७ मिमी, ईटकूर ७१ मिमी, शिराढोण ७२ मिमी, येरमाळा २१ मिमी, मोहा ५० मिमी, गोविंदपूर ३५ मिमी असा एकूण ५२़८३ मिमी पाऊस झाला आहे़ वाशी तालुक्यात तेरखेडा मंडळांतर्गत ६५ मिमी, पारगाव १०० मिमी, वाशी ४९ मिमी असा ७१़३३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे़ भूम तालुक्यात भूम मंडळांतर्गत ४९ मिमी, ईट ५२ मिमी, अंबी २४ मिमी, वालवड २० मिमी तर माणकेश्वर मंडळात ४० मिमी पाऊस झाला आहे़

Web Title: 48% on average