जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत ४५ टक्के जलसाठा
By Admin | Updated: February 3, 2017 00:57 IST2017-02-03T00:53:28+5:302017-02-03T00:57:29+5:30
जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरी ४४.८४ टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत ४५ टक्के जलसाठा
जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरी ४४.८४ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हा साठा केवळ ९ टक्के होता. त्यामुळे यंदा परिस्थिती समाधानकारक आहे. उन्हाळ्याची स्थिती पाहता जलसाठा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे.
सात मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. सात मध्यम प्रकल्पात ५३.५३. टक्के तर लघु प्रकल्पात ४१.३९ टक्के जलसाठा आहे. ५७ लघु प्रकल्पांपैकी २ कोरडे, ज्योत्याखाली पाणी पातळी असलेले चार, ० ते २५ टक्के जलसाठा असलेले १५, २६ ते ५० टक्के पाणीपातळी असलेले १५ तर ५१ ते ७५ टक्के जलसाठा असलेले २१ तर ७६ ते १०० टक्के जलसाठा असलेले ७ प्रकल्प आहेत. पाच मध्यम प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ६७ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्प ७२ टक्के, अप्पर दुधना प्रकल्प ५२ टक्के, जुई प्रकल्प ३१ टक्के, धामणा प्रकल्प १२ टक्के, जीवरेखा मध्यम ५७ टक्के, गल्हाटी मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के आज रोजी जलसाठा आहे. (प्रतिनिधी)