शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
3
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
4
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
5
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
6
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
7
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
8
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
9
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
10
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
11
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
12
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
13
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
14
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
15
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
16
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
17
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
18
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
19
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
20
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युदूत बनलेले ४५ टँकर रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:51 IST

नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेने खाजगी कंत्राटदारांकडून ८० पेक्षा अधिक पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. यातील तब्बल ४५ टँकरचालकांकडे आरटीओ कार्यालयाची पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनीही या मृत्युदूत टँकर्सचा विमा काढून दिलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेने खाजगी कंत्राटदारांकडून ८० पेक्षा अधिक पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. यातील तब्बल ४५ टँकरचालकांकडे आरटीओ कार्यालयाची पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनीही या मृत्युदूत टँकर्सचा विमा काढून दिलेला नाही. शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिवाशी खेळ महापालिकेने चालविला आहे. या गंभीर प्रकाराकडे मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.महापालिकेच्या टँकरने सर्वसामान्यांना चिरडल्याची घटना नवीन नाही. मुकुंदवाडीत दोन वर्षांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीला मनपा कंत्राटदाराच्या टँकरने चिरडले होते. नंदनवन कॉलनीत टँकरने एका वाहनधारकाला जोरदार धडक दिली होती. त्यात सुदैवाने कोणी मरण पावले नव्हते. मागील आठवड्यात मनपा कंत्राटदाराच्या टँकरने सिडको एन-५ येथे बीएचएमएस करणारी भावी डॉक्टर तरुणी पायल वसंत राठोड हिला चिरडले. या अपघातात ती मरण पावली. पायलला ज्या टँकरने धडक दिली तो टँकर नियमबाह्य असल्याचे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. टँकरचालकाकडे आरटीओचा टँकर म्हणून परवाना नाही. परवानाच नसेल तर फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याचा प्रश्नच येत नाही.विमा कंपन्याही टँकरचालकाला दारावर उभे करायला तयार नाहीत. एका निष्पाप तरुणीचा नियमबाह्य टँकरने मृत्यू झाल्यानंतरही मनपा प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. दोषी टँकरचालकांवर कारवाईसुद्धा करायला तयार नाही. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे आणखी ४५ टँकर अशाच पद्धतीने धावत आहेत. यातील एकाही टँकरचालकांकडे आरटीओचा परवाना नाही. नियमानुसार मनपाने भाडेतत्त्वावर टँकर लावल्यानंतर टँकरचे सर्व कागदपत्रे मनपाकडे जमा असायला हवेत. मनपाने तयार केलेला नियम मनपा स्वत:च पायदळी तुडवीत आहे. शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिवावर नियमबाह्य टँकरचालक उठलेले असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.