अंगणवाड्यांसाठी साडेचार लाखांचा निधी

By Admin | Updated: July 29, 2014 01:07 IST2014-07-29T00:33:30+5:302014-07-29T01:07:10+5:30

पाथरी : अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी तालुकास्तरावरून मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या आहेत.

4.5 crore funds for the anganwadi | अंगणवाड्यांसाठी साडेचार लाखांचा निधी

अंगणवाड्यांसाठी साडेचार लाखांचा निधी

पाथरी : अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी तालुकास्तरावरून मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या आहेत. आता पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंगणवाड्याच्या आधुनिकीकरणासाठी साडेचार लाख रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरील शेष निधीमधून राखीव ठेवण्यात आला आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत लोकसहभागातून अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून आयएसओ दर्जा मिंळविण्यासाठी प्रशासकीयस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये ग्रामस्थ, पदाधिकारी, पालक यांच्या बैठका घेऊन लोकससहभाग गोळा करण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. याकामी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असलेल्या शेष निधीतून महिला व बालकल्याण विभागासाठी दहा टक्के निधी साडेचार लाख रुपये अंगणवाडी आधुनिकीकरणासाठी देण्यात आला आहे. यामध्ये रंगरंगोटी करणे, इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. (वार्ताहर)
सात गावांना मिळणार निधी
अंगणवाडीच्या आधुनिकीकरणासाठी पंचायत समिती स्तरावरील राखीव ठेवण्यात आलेल्या निधीमध्ये लिंबा, बाबूलतार, पाटोदा, देवेगाव, रेणाखळी, कानसूर, पाथरगव्हाण या गावांचा समावेश आहे. बाबूलतार आणि पाटोदा येथील प्रत्येकी एक लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अंगणवाड्यांचा दर्जा सुधारेल- पाटील
अंगणवाड्यांसाठी निधी राखीव ठेवल्यानंतर या अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण होऊन अंगणवाड्यांचा दर्जा सुधारेल आणि पर्यायाने अंगणवाड्या आयएसओ होतील, असा आशावाद पंचायत समितीच्या सभापती अर्चना शंंतनू पाटील यांनी व्यक्त केला.
इंग्रजीचे धडे मिळणार
अंगणवाड्या आयएसओ करीत असताना या अंगणवाड्यांमधून प्रवेश घेणाऱ्या बालकांना आता इंग्रजीचे धडे मिळणार आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे उगविलेले पेव कमी आहे.

Web Title: 4.5 crore funds for the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.