शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:52 IST

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोड २०० फूट रुंद करण्यासाठी मंगळवारी महापालिकेने ४४५ अनधिकृत मालमत्तांवर कारवाई केली. मयूर पार्क भागात एका हॉटेल व्यावसायिकाने विरोध केला. आंबेडकरनगरात कारवाईपूर्वी थोडासा तणाव निर्माण झाला होता. मात्र, विरोध झुगारून महापालिकेने कारवाई पूर्ण केली. विशेष बाब म्हणजे सकाळी पाऊस सुरू असतानाही कारवाई थांबली नाही.

महापालिकेने दोन दिवस अगोदरच जळगाव रोडवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बहुतांश मालमत्ताधारकांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सामान आणि अनधिकृत बांधकाम काढून घेतले होते. हर्सूल टी पॉइंटपासून कारवाईला सुरुवात केली. मयूर पार्क भागात पथक आल्यानंतर एका हॉटेल विक्रेत्याने कडाडून विरोध दर्शविला. पोलिस आणि मनपाच्या माजी सैनिकांनी त्याला बाजूला घेत कारवाई पूर्ण केली. हॉटेल मालकावर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसबीओ शाळेसमोर छोट्या-मोठ्या मालमत्तांवर जेसीबीने कारवाई केली. जाधववाडी सिग्नलपर्यंत किरकोळ स्वरूपात कारवाई केली. पुढे एका खाजगी मालमत्ताधारकाने जमिनीवर पत्रे लावले होते. त्यांचा विरोध झुगारून पत्रे काढण्यात आले.

कलावती लॉनच्या बाजूला मोठी तीन मजली इमारत ३० मीटर रस्त्यात बाधित होत होती. दोन मोठे पोकलेन लावून या इमारतीचा जिना, दर्शनी भाग दोन तासांच्या मेहनतीनंतर जमीनदोस्त केला. रेणुका माता मंदिरासमोर बऱ्याच व्यावसायिक मालमत्ता होत्या. त्यासुद्धा पाडण्यात आल्या. निवासी मालमत्तांना हात लावला नाही.

दोन मजली इमारतीचे निकृष्ट बांधकामरेणुका माता मंदिरासमोर १२०० चौरस फुटांवर दोन मजली व्यावसायिक इमारत बांधली होती. इमारतीचे कॉलम आणि भिंती उभ्या होत्या. मात्र, त्याचा वापर होत नव्हता. संपूर्ण इमारत ३० मीटरमध्ये बाधित होत होती. मनपाने जेसीबी लावताच पहिला कॉलम पत्त्यासारखा कोसळला. भिंतीवर जेसीबीचे फावडे मारताच इमारत कोसळत होती. इमारतीचा स्लॅब पाडला, त्यात नाममात्र लोखंड, सिमेंटचा अत्यल्प वापर दिसून आला. या इमारतीचा सांगडा वर्षभरात आपोआप पडला असता. हे दृश्य पाहून उपस्थित जमाव आणि मनपा अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका