लातुरात ४४, औशात ६९ टक्के

By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:16:28+5:302014-06-30T00:38:38+5:30

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३ अ व औसा ऩप़च्या प्रभाग क्ऱ ५ च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले़

44 in Latur, 69 percent in Osh | लातुरात ४४, औशात ६९ टक्के

लातुरात ४४, औशात ६९ टक्के

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३ अ व औसा ऩप़च्या प्रभाग क्ऱ ५ च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले़ लातूर मनपातील प्रभाग १३ साठी ४४.११ टक्के मतदान झाले. तर औशाच्या प्रभाग ५ साठी ६९ टक्के मतदान झाले़ लातूरची मतमोजणी सोमवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल़ तर औश्याची मतमोजणी औसा तहसील कार्यालयात होणार आहे़
लातूर मनपाचा प्रभाग क्र. १३ अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसचे अ‍ॅड. व्यंकट बेद्रे गत निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी बसपाचे उमेदवार डॉ. विजय अजनीकर यांचा पराभव केला होता. परंतु, अ‍ॅड. बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. सध्या झालेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रफुल्ल कांबळे, बसपापुरस्कृत डॉ. विजय अजनीकर, अपक्ष विठ्ठल भोसले, शिवप्रसाद शृंगारे यांच्यात लढत झाली. बसपापुरस्कृत डॉ. विजय अजनीकर यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रफुल्ल कांबळे आणि डॉ. अजनीकर यांच्यातच खरी चुरस असल्याचे मतदारांतून बोलले जात होते. रविवारी मतदान झाले असून, ७ हजार ८० मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात फक्त ४४.११ टक्केच मतदान झाले आहे. ३१२३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अन्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. उमेदवारांसह पक्ष कार्यकर्त्यांनी मतदान करण्याचे आवाहन करूनही मतदानासाठी उत्साह नव्हता. सकाळी ८ वाजेपासून मतदान केंद्रावर तुरळक मतदार मतदानासाठी आले. ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुन्हा मतदानात वाढ झाली. एक-दोन केंद्रांवर मतदारांच्या रांगाही लागल्या होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत ३६ टक्क्यांपर्यंत मतदान गेले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४.११ टक्के मतदान झाले. विशाल नगर परिसरातील निर्मलादेवी काळे विद्यालयातील बूथ क्र. १ वर ४६.५२, बूथ क्र. २ वर ३४.३८, बूथ क्र. ३ वर ३६.४५ तर विक्रम नगर येथील दत्तुसिंह विद्यालयाच्या मतदान केंद्रावरील बूथ क्र. ४ वर ४०.७९, बूथ क्र. ५ वर ५३.७०, बूथ क्र. ६ वर ४७.१४ टक्के मतदान झाले.
रामजी सुभेदार नगर येथील मनपा शाळेतील मतदान केंद्रावरील बूथ क्र. ७ वर ५५.१७, बूथ क्र. ८ वर ३६.९७ टक्के मतदान झाले. या सर्व केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ४४.११ टक्के मतदान झाले. ७ हजार ८० मतदारांपैकी ३१२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण सभागृहात मतमोजणी...
लातूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ९ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दोन तासांत मतमोजणी पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जावळीकर यांनी दिली. तर औसा न.प.च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी औसा तहसील कार्यालयात सकाळी ९ वाजता होणार आहे.
औशात प्रभाग ५ ची पोटनिवडणूक...
औसा नगरपालिकेतील प्रभाग क्र. ५ साठीही रविवारी पोटनिवडणूक झाली. ६९ टक्के मतदान झाले असून, एकूण चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या चाँदबी पटेल, अपक्ष मेहरुनबी शेख, मंगलबाई बेवनाळे, तस्लीम पठाण हे चौघेजण आमने-सामने होते. सुरैय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली असून, रविवारी ४१८४ मतदारांपैकी २८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: 44 in Latur, 69 percent in Osh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.