४३ कोटींचा पीकविमा मंजूर
By Admin | Updated: June 18, 2016 00:49 IST2016-06-18T00:38:13+5:302016-06-18T00:49:53+5:30
भोकरदन : तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजने अंर्तगत १ लाख ५२ हजार ६८७ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत

४३ कोटींचा पीकविमा मंजूर
भोकरदन : तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजने अंर्तगत १ लाख ५२ हजार ६८७ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पिकविमा काढला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना ४३ कोटी ९ लाख ९० हजार रूपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्याना वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका प्रमुख दत्तू पांडे यांनी सांगितले़
बँकेचा शाखेनिहाय शेतकऱ्याना मंजुर करण्यात आलेला पीक विमा याप्रमाणे भोकरदन ४० हजार ४३४ सभासदांना १० कोटी ६० लाख ८० हजार, बाभुळगाव ८ हजार ५९४ सभासदांना २ कोटी ४८ लाख ७५ हजार, आन्वा १२ हजार २९४ सभासदाना ३ कोटी ३० लाख ९५ हजार, जळगाव सपकाळ ११ हजार ५७६ सभासदांना ३ कोटी ३७
हजार ७८ हजार रूपये, धावडा २ हजार ७२० सभासदाना १ कोटी ७३ लााख २८ हजार, पारध ३ हजार १७१ सभासदाना १ कोटी ८१ लाख ४६ हजार, पिंपळगाव रेणूकाई १४ हजार १७६ सभासदांना ३ कोटी ९६ लाख ३८ हजार, केदारखेडा १७ हजार १८७ सभासदाना ३ कोटी ९३ लाख ५८ हजार, राजुर ८ हजार २१७ सभासदाना ३ कोटी ४८ लाख १७ हजार, नळणी बु १२ हजार ८४२ सभासदाना ३ कोटी ७९ लाख १५ हजार, पिपळगाव कोलते ८ हजार १५१ सभासदाना १ कोटी ४३ लाख ४१ हजार, हासणाबाद ५
हजार १३ सभासदाना १ कोटी २२ लाख ६९ हजार, सिरसगाव वाघ्रुळ ८ हजार ३१२ सभासदांना १ कोटी ९३ लाख ५० हजार रूपये पीक विमा मंजूर केला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन,
कापूस, तूर, उडीद, मूग, भुईमूग, या पीकाचा विमा काढला होता, ज्यांनी पीक विमा काढला होता त्याच शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. (वार्ताहर)