४२६ दारू दुकानांना टाळे

By Admin | Updated: April 2, 2017 00:15 IST2017-04-02T00:14:18+5:302017-04-02T00:15:26+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘

426 avoid liquor shops | ४२६ दारू दुकानांना टाळे

४२६ दारू दुकानांना टाळे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘ड्राय-डे’ नसतानाही दारूविक्रीची दुकाने बंद असल्याने दारूविक्रेत्यांसह तळीरामांचीही मोठी गोची झाल्याची चर्चा रंगली होती़
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली देशी, विदेशी, वाईन विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ २० हजार लोकवस्ती असलेल्या भागातील राष्ट्रीय, राज्य मार्गापासून २२० मीटर दूर दुकाने ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात ३१ मार्चनंतर अशा देशी, विदेशी, वाईन शॉप, परमीटररूम, बिअरशॉपी, क्लब लायसन्स आदींना परवाने देऊ नयेत, अशा सूचना दिल्या होत्या़ यातील अनेक दुकानांना माल पुरवठाही बंद करण्यात आला होता़ तर काहींनी माल खरेदी न करणेच पसंत केले होते़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील तब्बल ४२६ दुकाने बंद ठेवण्यात आली होती़ यात देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप,२४१ परमीट रूम, ३ क्लब लायसन, १२८ बिअरबार बंद झाले आहेत़ यातउमरगा विभागातील १४ देशी दारूची दुकाने, एक वाईनशॉप, ४५ परमीटरूम तर ३१ बिअरशॉपी असे ९१ दुकाने बंद झाले आहेत़
उस्मानाबाद विभागातील देशी दारुची १२, २ वाईनशॉप, ५५ परमीटरूम, १८ बिअर शॉपी अशी ८७ दुकाने बंद झाली आहेत़ भूम विभागातील देशीदारूची १३, एक वाईनशॉप, ८८ परमीटर रूम, २ क्लब लायसन्स तर ४२ बिअर शॉपी असे १४६ दुकाने बंद झाली आहेत़ तर तुळजापूर विभागातील देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप, २४१ परमीटरूम, ३ क्लब लायसन्स तर १२८ बिअर शॉपी बंद झाली आहेत़
जिल्ह्यातील ४८५ देशी-विदेशी, बिअर, वाईन विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडून शासनाला जवळपास पावणेतीन कोटी रूपयांचा महसूल मिळत होता़ परवाना नुतनीकरणातूनही चांगला महसूल मिळत होता़ मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेकांचे परवाने नुतनीकरण झालेले नाही़ तर तब्बल ४२६ दुकानांना टाळे लागले आहे़ ही दुकाने वर्षभर बंद राहिली तरी जवळपास सव्वादोन कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे़ अनेकांनी दुकाने इतरत्र टाकण्यासाठी जागेची शोधमोहीम सुरू केली असून, अनेकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे़ दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महसूल बुडणार असल्याने शासन कोणता तोडगा काढते का ? याकडेही दारूविक्री करणाऱ्या व्यसायिकांचे लक्ष वेधले आहे़

Web Title: 426 avoid liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.