दहावीच्या परीक्षेला ४२ हजार विद्यार्थी
By Admin | Updated: March 1, 2016 00:47 IST2016-03-01T00:10:22+5:302016-03-01T00:47:05+5:30
बीड : मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. जिल्ह्यात ४२ हजार परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. १ ते २८ मार्च या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

दहावीच्या परीक्षेला ४२ हजार विद्यार्थी
बीड : मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. जिल्ह्यात ४२ हजार परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.
१ ते २८ मार्च या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. १४५ केंद्रांवर ही परीक्षा होत असून, नियमित ४० हजार ८७७ तर १११२ पुनर्पपरीक्षार्थी असे मिळून एकूण ४१ हजार ९८९ परीक्षार्थी आहेत.
परीक्षेसाठी १५ ठिकाणी परीरक्षक (कस्टोडियन) केंद्राची सोय करण्यात आली आहे. भरारी पथके, बैठे पथकांमार्फत परीक्षार्थींची झाडाझडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रांमार्फत मोबाईल नेण्यासही मज्जाव केला आहे. केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहे. (प्रतिनिधी)