शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षांनंतर मोठा दुष्काळ !

By admin | Updated: August 22, 2014 00:59 IST

बालाजी थेटे , औराद शहाजानी जून, जुलै आणि निम्मा आॅगस्ट संपला तरी लातूर जिल्ह्यात उन्हाळाच आहे. एकदा पेरणी झाली, पण उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता तर पावसाचा थेंबही नाही

बालाजी थेटे , औराद शहाजानीजून, जुलै आणि निम्मा आॅगस्ट संपला तरी लातूर जिल्ह्यात उन्हाळाच आहे. एकदा पेरणी झाली, पण उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता तर पावसाचा थेंबही नाही. डोळ्यांदेखत उभे पीक करपत आहे. १९७२ पेक्षा भयावह परिस्थिती ओढवली आहे. त्यावेळी १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. आता २१ आॅगस्ट अखेर १७८.२ मि.मी. पाऊस झाला. ४२ वर्षांनंतर दुष्काळाची भयावह स्थिती आली आहे. माणसं जगतील, पण जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी परिसर ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. परंतु, यंदा पावसाअभावी ही ओळख पुसून जात आहे. पिके वाळत आहेत. दरवर्षी जून महिन्यात पेरणी होते. पण यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी झाली. त्यानंतर थोडा पाऊस झाल्याने पिकांना उभारी आली होती. परंतु, नंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके कोमेजून गेली. आता तर करपत आहेत. उभी पिके डोळ्यांदेखत करपत असल्याने काही शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरविला आहे. तगरखेडा येथील शेतकरी नरसिंग गोविंद तिफनवणे यांनी सोयाबीन, ज्वारीचे पीक करपत असल्याने पिकावरच बैलपाळी घातली. पेरणीनंतर पिके आली, पण नंतर पाऊस झालाच नाही. त्यामुळे पिकांनी माना टाकल्या. आता तर ते होरपळू लागली आहेत, हे पाहवत नसल्याने त्यांनी उभ्या पिकावर पाळी चालविली. विलास पाटील यांनीही दहा एकर सोयाबीन पिकावर पाळी घातली आहे. अशोक बिराजदार, नरसिंग तिफनबणे यांचीही पिके वाळून गेल्याने पाळी घालण्यात आली आहे. नरसिंग तिफनबणे यांनी ८० किलो सोयाबीन, १० किलो तूर, २ किलो तीळ, ५ किलो ज्वारीचा पेरा केला होता. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला. परंतु, पाण्याअभावी ही सर्व पिके वाळून गेली असल्याचे ते म्हणाले. १९७२ ला जून महिन्यात ३०, जुलै महिन्यात ३०.४०, आॅगस्ट महिन्यात १०.०४, सप्टेंबरमध्ये ६०.०८, आॅक्टोबरमध्ये ७.४ मि.मी. पाऊस झाला होता. १५२.२ मि.मी. वार्षिक सरासरी पाऊस झाला होता. यंदा २०१४ मध्ये जून महिन्यात ७३.०, जुलै महिन्यात ८३.०, आॅगस्ट महिन्यात २२.२ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी १७८.२ मि.मी. पाऊस आहे. १९७२ पेक्षा सरासरीत यंदाचा पाऊस थोडा अधिक असला स्थिती वाईट आहे.औराद परिसरातून तेरणा व मांजरा या दोन नद्या वाहतात. औराद, वांजरखेडा, तगरखेडा, सोनखेड, गुंजरगा, किल्लारी, मदनसुरी येथे कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु, पाऊस झाला नसल्यामुळे बंधारे कोरडे पडले आहेत. साठवण तलाव व ओढेही कोरडेच आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. मोरांची संख्या घटली...४पावसाळा म्हटले की, मोरांचे थवे दिसायचे. परंतु, यंदा मोरांची संख्या घटलेली दिसत आहे. नदीचे पाणी आटल्याने ही संख्या घटली आहे. पक्ष्यांचा किलबिलाटही कमी झाला आहे. टोळीने राहणारे शेकडो वानर अन्न-पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. १९७२ चा दुष्काळ अनुभवलेले शेतकरी अशोक बिराजदार म्हणाले, त्यावेळच्या दुष्काळात जून महिन्यात थोडा पाऊस पडला होता. त्यावेळी पाणी होते. परंतु, अन्नधान्य नव्हते. या दुष्काळात उलट स्थिती आहे. अन्नधान्य आहे, परंतु पाणी नाही. त्यावेळी नाले, ओढे, नद्या, तलावांत पाणी होते. परंतु, यंदाच्या दुष्काळात सगळीकडेच कोरड आहे. ४व्यंकटराव वलांडे म्हणाले, १९७२ च्या दुष्काळात पाणीटंचाई जाणवली नव्हती. परंतु, अन्नधान्यासाठी भटकंती करावी लागली. या दुष्काळात धान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, पाणी नाही अन् जनावरांना चाराही नाही. औराद कृषी मंडळाअंतर्गत ३१ हजार २०० हेक्टर्सवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापैकी अडीचशे शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तर दोनशे हेक्टर्सवरील शेतकऱ्यांनी पिके वाळत असल्याने नांगर फिरविला आहे, असे मंडळ कृषी अधिकारी गोपाळ जाधव यांनी सांगितले.