४१६ शिक्षकांनी मारली परीक्षेला दांडी
By Admin | Updated: December 15, 2014 00:41 IST2014-12-15T00:25:05+5:302014-12-15T00:41:36+5:30
जालना : शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षा रविवारी शहरातील २९ केंद्रावर घेण्यात आली. यात ४१६ शिक्षकांनी दांडी मारली

४१६ शिक्षकांनी मारली परीक्षेला दांडी
जालना : शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षा रविवारी शहरातील २९ केंद्रावर घेण्यात आली. यात ४१६ शिक्षकांनी दांडी मारली. आता ही संधी केंव्हा उपलब्ध होईल, याची शाश्वती नाही, हे माहीत असूनही दांडी मारण्यात आली. परीक्षेसाठी उपस्थितीचे प्रमाण ९५.२४ होते.
परीक्षेचे प्रमुख शिक्षणाधिकारी अशोक राऊत होते. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत ही परीक्षा झाली. या परीक्षा पहिल्या सत्रात पहिली ते पाचवी वर्गासाठी डी.टी.एड. शिक्षकांसाठी परीक्षा होती. यासाठी १८ परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रात २५ विद्यार्थी बसण्याची क्षमता होती. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षा होती. यासाठी ५ हजार ५८४ शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील ५ हजार ३२२ शिक्षकांनी परीक्षा दिली. २६२ शिक्षक गैरहजर राहिले. या परीक्षेच्या नियोजनासाठी ४ झोनल अधिकारी नेमण्यात आले होते.
बी.एड. साठी सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत घेण्यात आली.
यासाठी ३ हजार १६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३ हजार ८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५४ विद्यार्थी गैरहजर राहिले. या परीक्षेच्या नियोजनासाठी ३ झोनल अधिकारी नेमण्यात आले होते.
अशोक राऊत यांनी सांगितले, परिक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी चार भरारी पथक नेमण्यात आले होते. प्राथमिक, माध्यमिक, डायएट व महसूल विभागाचे पथक होते. मात्र एकही गैरप्रकार आढळून आला नाही. परीक्षा सुरळीत पार पडली.