४१२ विद्यार्थी देणार आज एनटीएस परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:34 IST2017-11-12T00:34:51+5:302017-11-12T00:34:57+5:30
प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ४१२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे तसेच फिरते पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली.

४१२ विद्यार्थी देणार आज एनटीएस परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत (राज्यस्तर) राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ४१२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे तसेच फिरते पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली.
सदर परीक्षा ५ नोव्हेंबरला घेण्याचे ठरले होते. परंतु दिवाळीच्या सुट्यांमुळे परीक्षेच्या तारखेत बदल करून सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा आता १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. दहावीत शिकत असलेले विद्यार्थी राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र असतात. राज्यस्तर परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ते बारावी दरमहा १२५० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच पदवी-पदव्युत्तर २००० हजार रूपये तर पीएच.डी.साठी विद्यापीठ आयोगाच्या मान्य दराने शिष्यवृत्ती मिळते. १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील दोन केंद्रावरून राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंगोली येथील अनसूया विद्यामंदिर केंंद्रावरून २८५ तर वसमत येथील बर्हिजी महाविद्यालय केंद्रावरून १२७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेस विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेचे नियोजन झाल्याचे विनोद करंडे यांनी सांगितले.