शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

४१९४१ शेतकऱ्यांना कंपन्यांकडून ठेंगा !

By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST

उस्मानाबाद : सोयाबीन बियाण्याच्या टंचाईचा फायदा उठवित काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी दर्जाहीन बियाणे मारले. पेरणी करूनही बियाण्याची उगवण झाली नव्हती.

उस्मानाबाद : सोयाबीन बियाण्याच्या टंचाईचा फायदा उठवित काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी दर्जाहीन बियाणे मारले. पेरणी करूनही बियाण्याची उगवण झाली नव्हती. अशा तब्बल २ हजार ३९९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. परंतु, १ हजार ९४१ शेतकऱ्यांना या कंपन्यांनी ठेंगा दाखवित ना बियाण्याचे पैसे परत केले ना बियाणे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला. त्यामुळे ऐन पेरण्यांच्या तोंडावर बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. हीच संधी साधत काही कंपन्यांनी दर्जाहीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. बियाण्याची उगवण होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला. २ हजार ४६० हेक्टवरील बियाण्याची उगवण न झाल्याने पेरणी केलेले सुमारे ६ हजार १७७ बॅग बियाणे मातीत गेले. अशा २ हजार ३९९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर नुकसानीचे पंचानामेही करण्यात आले होते. दर्जाहिन बियाण्याबाबत मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर काही कंपन्यांनी बियाणे बदलून देवू, असे सांगितले होते. तर काही कंपन्यांनी पैसे देण्यात येतील, असे कृषी विभागाला कळविले होते.परंतु, मोजक्या कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचे काम केले. २ हजार ३९९ पैकी केवळ साडेचारशे शेतकऱ्यांनाच बियाणे व पैसे दिले. त्यामुळे आजही सुमारे १ हजार ९४१ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, हे शेतकरी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी नुकसान भरवाईची मागणी करीत आहेत. परंतु, संबंधित कार्यालयांकडून त्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे. सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगाम-२०१५ ची तयारी सुरू करण्यात आलेली असतानाही खरीप हंगाम-२०१४ मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र रोष व्यक्त होत आहे. जिल्हाभरातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण झाली नसल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी ४५८ शेतकऱ्यांना १ हजार २५८ बॅग बियाणे व २१ लाख ७ हजार रूपये परत केले आहेत. तसेच ७६ कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. तर एका कंपनीचा बियाणे उत्पादन परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ज्या कंपन्या टाळाटाळ करतील त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शेतकऱ्यांकडून होत असलेली बियाण्याची मागणी लक्षात घेत घेता कंपन्याही त्याच गतीने वाढल्या. थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल ४१ कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्याच्या पुरवठा केला. यामध्ये महाराष्ट्रासोबतच दिल्ली, हैद्राबाद, राजस्थान आदी राज्यातील कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व कंपन्याच्या बियाणांबाबत कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. यापैकी काही कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता ही ६० ते ७० टक्के तर काहींची ५० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे आढळून आले होते. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता आढळून आल्यानंतर संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांना तक्रार निवारणासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यावर मोजक्याच कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे व पैसे परत केले. उर्वरित कंपन्या मात्र, कृषी विभागाच्या नोटिसेला भिक घालत नसल्याचे दिसून येते. कारण आजाही सुमारे १ हजार ९४१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरूद्ध कठारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.