शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

मराठवाड्यात टँकर लॉबीवर ४0१ कोटींची खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:31 IST

मराठवाड्यात दुष्काळाआडून टँकर लॉबीचे चांगभलं केलं जात आहे. पाच वर्षांत तब्बल ४०१ कोटी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या नावानं चांगभलं : २०१५-१६ वर्षात सर्वाधिक २२५ कोटी टँकरवर खर्च

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाआडून टँकर लॉबीचे चांगभलं केलं जात आहे. पाच वर्षांत तब्बल ४०१ कोटी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च करण्यात आला आहे.पाच वर्षांत ९ हजार २६५ टँकरने मराठवाड्यातील सुमारे १ कोटी जनतेला पाणी पुरविले आहे. एवढ्या खर्चामध्ये मराठवाड्यातील १० गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनांची कामे झाली असती; परंतु दुष्काळात इष्टापत्ती शोधणाऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करून पैसा अक्षरश: ‘सायफन’ केला. परिणामी, मराठवाड्यातील ८ हजार ५५० पैकी बहुतांश गावे आजही टंचाईचा सामना करीत आहेत.मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत ग्रामीण भागाला टँकरने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तीन जिल्ह्यांत पाणीटंचाईची स्थिती नाजूक वळणावर आहे.मराठवाड्यात लहान-मोठे व मध्यम ८६७ प्रकल्प आहेत. त्यात २३ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठ्या धरणांपैकी जायकवाडीत ४५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये २६ टक्के पाणी आहे. विभागात ६०० टँकर सुरू आहेत. त्यात औरंगाबादेत सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जास्त विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत केले आहे. ११ प्रकल्पांवर मोठी शहरेअवलंबून आहेत. एमआयडीसी व प्रादेशिक योजनांना यातून पाणीपुरवठा होत आहे. गेल्या वर्षी विभागात ८६ टक्के पाऊस झाला.औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यांत पाऊस कमी झाला. यंदा टँकरची संख्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत कमी असली तरी १० लाख ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. ५० हजार विहिरींचे काम गेल्या दोन वर्षांत झाले आहे. ३१ हजार विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे.विभागात २६ हजार शेततळी दिली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी ४६४ कोटी, जलस्वराज्य टप्पा २ साठी १०९ कोटी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी ९४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सर्व कामे मार्च २०१८ पर्यंत या निधीच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्टहोते.पाच लाख एका टँकरलापाच वर्षांत एका टँकरवर पाच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्यात एका टँकरने दरमहा ३० हजार रुपयांच्या मोबदल्यात पाणीपुरवठा केला आहे. एकीकडे टँकर लॉबी पाच वर्षांत गब्बर झाली, तर दुसरीकडे पाच वर्षांपासून मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांचा आकडा कमी होण्यास तयार नाही....एवढ्या खर्चात काय झाले असतेटँकर लॉबीला एवढी मोठी रक्कम अदा करण्यात आली आहे. या खर्चातून विभागातील किमान १० पाणीपुरवठा योजनांची कामे झाली असती. २०१५-१७ या दोन वर्षांत लातूरमध्ये तर रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. टँकरच्या खर्चाव्यतिरिक्त जलयुक्त शिवार योजनेतही मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. असे असताना मराठवाड्याला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी काहीही नियोजन होताना दिसून येत नाही.मराठवाड्यातील टँकरवर जिल्हानिहाय खर्चऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत टँकरवर ४०१ कोटी रुपयांचा खर्च झाला. २२९ कोटी रुपयांचा सर्वाधिक खर्च २०१५-१६ या साली करण्यात आला. दुष्काळाच्या झळा त्यावर्षी मोठ्या प्रमाणात होत्या. २०१३-१४ साली टँकरसाठी ७८ कोटी रुपयांचा चुराडा झाला.वर्ष टँकर खर्च२०१३-१४ २,१३६ ७८ कोटी२०१४-१५ १,४४४ ४४ कोटी२०१५-१६ ४,०१५ २२९ कोटी२०१६-१७ ०,९४० २५ कोटी२०१७-१८ ०,६०० २५ कोटीएकूण ९,२६५ ४०१ कोटी

टॅग्स :water transportजलवाहतूकMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई