‘एंड्रेस’च्या विस्तारीकरणातून ४०० जणांना रोजगार

By Admin | Updated: December 22, 2015 23:54 IST2015-12-22T23:42:34+5:302015-12-22T23:54:30+5:30

औरंगाबाद : ‘एंड्रेस- हाऊजर’ या आॅटोमेशन क्षेत्रातील कंपनीच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन वाळूज येथे मंगळवारी झाले. विस्तारित प्रकल्पात ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार

400 people get employment from expanding 'Andres' | ‘एंड्रेस’च्या विस्तारीकरणातून ४०० जणांना रोजगार

‘एंड्रेस’च्या विस्तारीकरणातून ४०० जणांना रोजगार

औरंगाबाद : ‘एंड्रेस- हाऊजर’ या आॅटोमेशन क्षेत्रातील कंपनीच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन वाळूज येथे मंगळवारी झाले. विस्तारित प्रकल्पात ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून चारशेपेक्षा जास्त जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष एन. श्रीराम यांनी सांगितले.
‘एंड्रेस- हाऊजर’चे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. आंद्रेस मायर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. एन. श्रीराम, सजीत नाथ, कुलाथू कुमार, नरेंद्र कुलकर्णी, रूपेश कोकाल्ले, आॅटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले, उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, उमेश दाशरथे, मिलिंद कंक, आशिष गर्दे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. ‘वाळूज औद्योगिक वसाहतीत १५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एंड्रेस- हाऊजरचा आता वटवृक्ष झाला आहे.
या उद्योगामुळे पहिल्या टप्प्यात ६०० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. विस्तारित प्रकल्पात सुरुवातीला ५० कोटीची गुंतवणूक करून ती शंभर कोटीपर्यंत वाढविली जाईल. त्यामुळे चारशेपेक्षा जास्त जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,’ असे एन. श्रीराम यांनी सांगितले.

Web Title: 400 people get employment from expanding 'Andres'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.