४० हजार लिटर दुधाची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:36 IST2017-10-06T00:36:19+5:302017-10-06T00:36:19+5:30
कोजागिरी पौर्णिमेसाठी शहरातील दूध विक्रेत्यांकडे ४० हजार लिटर दुधाची आवक झाली असून, यातून एका दिवसांत १६ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे़

४० हजार लिटर दुधाची आवक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोजागिरी पौर्णिमेसाठी शहरातील दूध विक्रेत्यांकडे ४० हजार लिटर दुधाची आवक झाली असून, यातून एका दिवसांत १६ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे़
गुरुवारी जिल्हाभरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली़ कोजागिरीच्यानिमित्ताने रात्री जागरण करून दूध प्राशनाचे कार्यक्रम ठिक ठिकाणी घेण्यात आले़ दरवर्षी कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दुधाच्या उलाढालीत विक्रमी वाढ होते़ यावर्षी देखील व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी केली असून, सायंकाळपर्यंत अनेक व्यापाºयांकडील दूध संपले होते़ शहरातील गांधी पार्क भागात ग्रामीण भागातून ५० ते ६० विक्रेते दररोज दुधाची विक्री करतात़ गुरुवारी या विक्रेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात वाढीव दूध विक्रीसाठी आणले होते़ सकाळीच अनेकांनी गांधी पार्क परिसरातून दुधाची खरेदी केली़ ग्रामीण भागातील दूध विक्रेत्यांबरोबरच शहरात देशमुख हॉटेल, ममता कॉलनी, पाण्याची टाकी, वसमत रोड, जिंतूर रोड, गणपती चौक, नानलपेठ कॉर्नर, विद्यानगर, गंगाखेड रोड आदी भागात दूध विक्रेत्यांनी आपल्या स्टॉल्सवर दुधाची विक्री केली़ दुपारपर्यंत हे दूध संपल्याचे पहावयास मिळाले़ शहरात अनेक ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचे कार्यक्रम घेण्यात आले़ या कार्यक्रमांसाठी आदल्या दिवशीच दुधाची बुकींग केली होती़ त्यामुळे अनेकांनी सायंकाळनंतर दूध खरेदी केले़ परभणी शहरात दररोज साधारणत: १५ हजार लिटर पॉकेट बंद दूध विक्री होते़ दररोज दुधाच्या विक्रीतून ६ लाख रुपयांची उलाढाल होत असते़ व्यापाºयांनी सुमारे १६ लाख रुपयांचे दूध विक्रीसाठी उपलब्ध केले आहे़ कोजागिरी निमित्ताने व्यापाºयांनी वाढीव दूध मागविले़ सायंकाळी उशिरा पर जिल्ह्यातील दुधाच्या गाड्या शहरात दाखल झाल्या़ त्यानंतर प्रत्यक्ष दूध विक्रीला प्रारंभ झाला़