उभ्या ट्रकमधून ४० हजाराची सुपारी लंपास
By Admin | Updated: June 13, 2015 23:55 IST2015-06-13T23:55:22+5:302015-06-13T23:55:22+5:30
पारगाव : घरासमोर लावलेल्या ट्रकमधील ४० हजार रुपयांच्या सुपारीच्या ७ बॅगा चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना पारगाव (ता़वाशी) येथे घडली असून,

उभ्या ट्रकमधून ४० हजाराची सुपारी लंपास
पारगाव : घरासमोर लावलेल्या ट्रकमधील ४० हजार रुपयांच्या सुपारीच्या ७ बॅगा चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना पारगाव (ता़वाशी) येथे घडली असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील दीपक परमेश्वर कोकणे हे चालक म्हणून ट्रकवर काम करतात़ दीपक कोकणे यांनी के़बीक़्रॉस कर्नाटक येथून ट्रकमध्ये (क्ऱजे़जी़३- ए़टी़३८१६) सुपारीच्या २३० बॅगा भरल्या होत्या़ हा माल घेवून ते अहमदाबाद येथे जात असताना गुरूवारी रात्री सुमारास ते पारगाव येथे आपल्या घरी थांबले होते़ घरासमोर ट्रक लावून ते घरात झोपण्यासाठी गेले़ पहाटेच्या सुमारास सतत पाऊस सुरू होता़ त्यानंतर शुक्रवारी दुपारी दीड वाजल्यापासून पाऊस सुरू झाला़ त्यामुळे या पावसात काही भिजले आहे का हे पाहण्यासाठी कोकणे हे ट्रकवर चढले होते़ त्यावेळी चोरट्यांनी ताडपत्री फाडून आतील सुपारीच्या बॅगा लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता आतील २३० बॅगांपैकी ४० हजार रूपयांच्या ७ बॅगा चोरीस गेल्याचे समोर आले़ त्यानंतर त्यांनी शनिवारी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ दीपक कोकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ डी़ जी़ कदम हे करीत आहेत़ (वार्ताहर)