शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

छत्रपती संभाजीनगरात कारमध्ये आढळलेली ४० लाखांची रोकड जप्त

By बापू सोळुंके | Updated: November 7, 2024 18:26 IST

औरंगाबाद पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिले रोकड जप्त करण्याचे आदेश

छत्रप्ती संभाजीनगर : गारखेडा सूतगिरणी चौकात  निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने ४० लाखाची रोकड जप्त केली. चौकशी अंती ही रक्कम एका पतसंस्थेची असल्याचे आणि अंतर्गत शाखा व्यवहाराची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित वाहनांवर क्यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करून कोषागार कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली.

विधानसभा  निवडणुक अत्यंत पारदर्शक व्हावी, पैशाचे अमिष दाखवून मतदान होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट सुचना केल्या आहेत. यानुसार प्रत्येक मतदारसंघात भरारी पथक आणि तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. गारखेडा सूतगिरणी चौकात असलेल्या तपासणी पथकाने आज एका कारमध्ये मोठी रोकड आढळून आली.  ही बाब समजताच निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह अन्य अधिकारी तेथे दाखल झाले. कारचालक सचीन सुरसिंग जाधव यांच्या चौकशी अंती ही रक्कम बिडकीन येथील व्यंकटेश मल्टी स्टेट को ऑपरेटीव सोसायटीची असल्याचे स्पष्ट झाले. पतसंस्थेच्या आंतरशाखा व्यवहाराकरीता ही रक्कम नेली जात असल्याचे चौकशीतून दिसून आले. 

परंतु, आदर्श आचारसंहितेत रकमेची हस्तांतरण करताना क्यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाकडे देण्यात आल्याचे गिरासे यांनी सांगितले. ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी गिरासे, नोडल अधिकारी प्राजक्ता वंजारी यांच्या मागर्दशनाखाली तपासणी पथकाचे नसीम शेख एकनाथ पडूळ,सचीन सोनी, श्याम उदावंत,  पोलीस कर्मचारी इंदलसिंग महेर आणि व्हिडिओग्राफर आदींचा समावेश होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक