भोकरमध्ये ४० कोटींचा रेल्वे उड्डाणपूल मंजूर
By Admin | Updated: June 29, 2014 00:26 IST2014-06-29T00:14:22+5:302014-06-29T00:26:00+5:30
नांदेड : भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलासह मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील रस्ते विकासांचा मार्ग मोकळा झाला आहे़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़
भोकरमध्ये ४० कोटींचा रेल्वे उड्डाणपूल मंजूर
नांदेड : भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलासह मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील रस्ते विकासांचा मार्ग मोकळा झाला आहे़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़
भोकर-नांदेड मार्गावरील भोकर शहरातील रेल्वे रुळावर होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत होती़ त्यासाठी चव्हाण हे प्रयत्नात होते़ रेल्वे उड्डाणपुलासाठी आता तब्बल ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ त्याचबरोबर नांदेड, हदगाव, तामसा, भोकर, उमरी शहरातील रस्त्यावर नाली व फुटपाथचे काम करण्यासाठी भरीव निधीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे़ नांदेड ते मुदखेड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मुदखेड तालुक्यातील देगाव, जवळा पाठक, जवळा मुरार, निवघा रस्त्याच्या सुधारणेसाठी पिंपळकौठा, राजवाडी, पारडी वैजापूर, निवघा, इजळी रस्त्याच्या सुधारणेसाठी आमदुरा, वाडी मुक्ताजी, चिकाळा, हजापूर, चिकाळा तांडा, डोणगाव, कोल्हा, शेंबुली, डोंगरगांव, खांबाळा, मुगट, धनज, पाथरड रेल्वेस्टेश्न, पाथरड हिस्सा, सरेगाव या रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे़ ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठीही चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे़ अर्धापूर तालुक्यातील लोणी, बेलसर, बारसगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी प्रस्तावित आहे़
सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड, भोकर विधानसभा मतदार- संघातील जून महिन्यात अर्थसंकल्पीय कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ शहर व ग्रामीण भागात विकासाचा समतोल राखण्यावर चव्हाण यांचे विशेष लक्ष आहे़ (प्रतिनिधी)