खरेदी-विक्री संघासाठी ४0 अर्ज
By Admin | Updated: April 26, 2016 23:42 IST2016-04-26T23:42:21+5:302016-04-26T23:42:58+5:30
हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खरेदी-विक्री संघासाठी ४0 अर्ज
हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ४0 अर्ज आले आहेत.
यामध्ये सोसायटी मतदारसंघात गोदावरी भगवान शिंदे, जगन नामदेव लोथे, केशव ग्यानु शांकट, जनार्दन चंद्रभान वैद्य, गोविंद फुलाजी भवर, श्रीराम कुंडलिका पठाडे, भारत मारुती बर्वे, भानुदास गोविंदराव वाबळे, नारायण व्यंकटराव जगताप, रुपाजी किशनराव गायकवाड, शंकर सीताराम शिंदे, गुलाबराव रामजी सरकटे, केशव शेषराव नाईक, शहरी विभाग मतदारसंघातून अशोक रामकृष्ण बासटवार, उमेश पांडुरंग नागरे, राजाराम तुकाराम बांगर, सचिन सूर्यकांत गुंडेवार, खेडे विभाग मतदारसंघातून सत्यनारायण रामकिशन तापडीया, राजाराम तुकाराम बांगर, रमेश विठ्ठलराव शिंदे, कुंडलिक मारोतराव नागरे, रामेश्वर आंबादास फाळके यांचा समावेश आहे.
महिला राखीव मतदारसंघातून वनमाला पांडुरंग नागरे, प्रमिला राजाराम बांगर, गोदावरी भगवान शिंदे, प्रयाग बळीराम बांगर, अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघात बालासाहेब गंगाराम आरळकर, गंगाराम सखाराम लोणकर, इतर मागासवर्ग मतदारसंघात भिकाजी दगडुजी मोहनकर, बिरजू नंदलाल यादव यांचा समावेश आहे. विजाभज-विमाप्र मतदारसंघात राजाराम तुकाराम बांगर, उमेश पांडुरंग नागरे, रामचंद्र नामदेवराव वैद्य यांचा समावेश आहे.
यातील अनेकांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. २७ एप्रिलपर्यंत छाननी होणार आहे. १२ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तर २२ मे रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल. डुकरे हे काम पहात आहेत.
खरेदी-विक्री संघाचे हाल पहाता निवडणूक घेणेही परवडणारी बाब नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. १२ मेपर्यंत वेळ असल्याने आता त्यासाठी फिल्डिंग लावली जाते की, मतदान होणार हे त्यानंतरच कळणार आहे . (प्रतिनिधी)
उकाडा वाढला
कौठा- वसमत तालुक्यात कौठा व परिसरात उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने जनता त्रस्त झाली आहे. उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम दिसून येत आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. उष्माघातापासून बचाव करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.