शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बदला अन् संपत्तीचा हव्यास, ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत फेकून खून; सख्ख्या काकूचे कृत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 20:11 IST

माटेगाव येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणाचे कोडे उलगडले, थरारक घटनाक्रम आला समोर

देवगाव रंगारी : गेल्या आठवड्यात चार वर्षीय सार्थक सागर जाधव या बालकाचा मृतदेह विहिरीत संशयितरीत्या आढळला होता. तो खेळताना विहिरीत पडला असावा, असा कयास बांधला जात होता. मात्र, सदरील बालकाचा त्याच्या सख्ख्या काकूनेच बदला व संपत्तीच्या हव्यासापोटी विहिरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात सोमवारी उघड झाले आहे. या घटनेमुळे कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुनीता गणेश जाधव असे क्रूरकर्मा काकूचे नाव आहे.

माटेगाव येथील गट नं. १७ मधील शेतवस्तीवर गणेश हिरामण जाधव व सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात. या दोघांना वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. मोठा भाऊ गणेश याच्या पत्नीचे नाव सुनीता असून, त्यांना दोन मुले आहेत. तर लहान भाऊ भाऊ सागर यास एक मुलगी व मुलगा सार्थक होता.

काही दिवसांपूर्वी सागर यांचा मुलगा सार्थकने खेळताना गणेश यांच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला. यामुळे त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. या घटनेपासून सुनीताच्या मनात चार वर्षीय सार्थकबद्दल प्रचंड राग होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सागर यांच्या पत्नीचे ऑपरेशन करून गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. भविष्यात तिला मूलबाळ होणार नाही, याची जाणीव सुनीताला झाली होती. त्यामुळे सार्थकला संपविले, तर बदलाही पूर्ण होईल व सर्व शेती आपल्या मुलांना मिळेल. असा विचार सुनीताच्या डोक्यात आला. तेव्हापासून ती संधी शोधत होती. ३१ जुलै रोजी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास सागर व त्यांची पत्नी दोघे शेतात गेले होते. तर त्यांची मुलगी शाळेत गेली होती. सार्थक घरात एकटाच होता. ही संधी साधून सुनीताने चिमुकल्या सार्थकला उचलून नेत घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिले. यातच बुडून सार्थकचा मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेहसार्थकला विहिरीत फेकून दिल्यानंतर काही झालेच नाही, असे दाखवून सुनीता घरी आली. काही वेळाने सागर जाधव घरी आले, तेव्हा त्यांना सार्थक घरात दिसला नाही. सर्व कुटुंबीय त्याला शोधण्याच्या कामाला लागले. तेव्हा सुनीताही त्याला शोधत होती. शेवटी देवगाव रंगारी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट रोजी सार्थकचा मृतदेह विहिरीत आढळला.

तपासादरम्यान सुनीतावर संशयसार्थकचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी त्याचा घातपात झाल्याच्या संशयावरून तपास सुरू केला. तेव्हा सार्थकची काकू सुनीता गणेश जाधवचे वागणे संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तिने मला काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि. संदिप राजपूत करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद