निवडणुकांसाठी ४ हजार ५०० ‘ईव्हीएम’ मागविल्या
By Admin | Updated: August 11, 2014 00:18 IST2014-08-11T00:12:10+5:302014-08-11T00:18:31+5:30
व्यंकटेश वैष्णव बीड विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहेत़ त्यामुळे जिल्हयात साडेचार हजार मतदान यंत्रे लागणार आहेत.

निवडणुकांसाठी ४ हजार ५०० ‘ईव्हीएम’ मागविल्या
व्यंकटेश वैष्णव बीड
विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहेत़ त्यामुळे जिल्हयात साडेचार हजार मतदान यंत्रे लागणार आहेत. उत्तरेतील इटावा येथून एक हजार ईव्हीएम यंत्र आले असून उर्वरित यंत्रांसाठी पाठपुरावा सुरु आहे.
जिल्हयात एकूण २ हजार १६८ मतदान केंदे्र आहेत़ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे़ यावेळी जिल्हयात लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहे. यामुळे मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ यंत्र जास्तीचे लागणार आहेत़ त्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून उत्तरेतील चार जिल्हयांमधून मतदान यंत्रे जिल्हयात आणण्याचे काम सुरू आहे़ इटावा येथून १ हजार बॅलेट युनिट तर ९०० कन्ट्रोल युनिट बीड येथे पहिल्या टप्प्यात पोहोचली आहेत़ उर्वरित ईव्हीएम यंत्र पुढील दोन दिवसांत येथे येणार आहेत़ लखनौ येथून २ हजार २०० बॅलेट युनिट, १ हजार कंट्रोल युनिट, चित्रकुट येथून ५०० कंटोल युनिट तर मोहाबा येथून ४०० कंट्रोल युनिट मागविण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले़