सापळा रचून ४ तस्करांना अटक ; ५७ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:22+5:302021-01-16T04:05:22+5:30

रामचंद्र ऊर्फ बंड्या रावसाहेब पिंपळे(रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा), विश्वनाथ ऊर्फ कोल्ह्या पंडित पिंपळे(रा.संजय नगर,मुकुंदवाडी),सुनील शिवाजी पवार(रा.कंधार, ता.करमाळा ,जिल्हा सोलापूर) ...

4 smugglers arrested for setting traps; 57 kg of cannabis seized | सापळा रचून ४ तस्करांना अटक ; ५७ किलो गांजा जप्त

सापळा रचून ४ तस्करांना अटक ; ५७ किलो गांजा जप्त

रामचंद्र ऊर्फ बंड्या रावसाहेब पिंपळे(रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा), विश्वनाथ ऊर्फ कोल्ह्या पंडित पिंपळे(रा.संजय नगर,मुकुंदवाडी),सुनील शिवाजी पवार(रा.कंधार, ता.करमाळा ,जिल्हा सोलापूर) आणि राम अशोक गावंडे(रा.साईनगर,गारखेडा), अशी आरोपींची नावे आहेत.

जुना बायपास मार्गे शहरात येत असलेल्या कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती खब-याने गुन्हे शाखेला दिली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव,विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल चासकर,मांटे, मीरा लाड,कर्मचारी नंदकुमार भंडारे,सतीश जाधव आणि इतरांनी आरोपींना पकडण्यासाठी चिकलठाणा जुना बायपास रस्त्यावर सापळा रचला. मध्यरात्रीनंतर संशयित कार (एम एच २० बीवाय १९५४) पोलिसांनी मोठ्या अडवली. यावेळी पोलिसांना पाहून आरोपी कारमधून उड्या घेऊन पळून जाऊ लागले. मात्र, सतर्क पोलिसांनी त्यांना जागेवर पकडले. यावेळी पंचासमक्ष कारची झडती घेतली असता कारच्या सीट खाली आणि डिक्कीत प्लास्टिक गोण्यामध्ये लपून ठेवलेले पाकीट दिसले. या पाकिटामध्ये १२ लाख ८६ हजार ९१० रुपयांचा तब्बल ५७ किलो ३८२ ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा आणि कार जप्त करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आणि त्यांना अटक केली.

==========(फोटोसह )=======

Web Title: 4 smugglers arrested for setting traps; 57 kg of cannabis seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.