अहमदनगर, जालना जिल्ह्यातील ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:12+5:302021-09-27T04:05:12+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मनपा हद्दीत १०, तर ग्रामीण भागात १०, अशा २० कोरोना रुग्णांची वाढ झाली. सुदैवाने ...

अहमदनगर, जालना जिल्ह्यातील ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मनपा हद्दीत १०, तर ग्रामीण भागात १०, अशा २० कोरोना रुग्णांची वाढ झाली. सुदैवाने गेल्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील ३ आणि जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ६१६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ९०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील १३, अशा २३ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना अहमदनगर जिल्ह्यातील निंबेनांदूर, शेवगाव येथील ७६ वर्षीय महिला, भाटकुडगाव येथील ५५ वर्षीय महिला, शेळगाव येथील ७६ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील पावसे पांगरी, अंबड येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
अगस्ती कॉलनी १, कटकटगेट १, नवजीवन कॉलनी १, एन -९ परिसर १, शिवाजीनगर १, उस्मानपुरा १, अन्य ४
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर २, सिल्लोड १, वैजापूर ४, पैठण ३.