महापालिकेच्या आखाड्यात ३९७ उमेदवार

By Admin | Updated: April 8, 2017 00:11 IST2017-04-08T00:09:02+5:302017-04-08T00:11:47+5:30

लातूर : लातूर मनपाच्या १८ प्रभागांतील ७० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ३९७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

397 candidates in municipal akhada | महापालिकेच्या आखाड्यात ३९७ उमेदवार

महापालिकेच्या आखाड्यात ३९७ उमेदवार

लातूर : लातूर मनपाच्या १८ प्रभागांतील ७० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ३९७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन दिवसांत ३३७ उमेदवारांनी माघार घेतली असून, भारतीय जनता पार्टीने २० आयारामांना तिकीट दिले आहे. त्यात माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे चिरंजीव अजित पाटील कव्हेकर यांचा समावेश आहे. तर काँग्रेसने विद्यमान २१ नगरसेवकांना तिकीट नाकारले असून, २७ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दरम्यान, ४३ नव्या चेहऱ्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
भाजपाने राष्ट्रवादीतून आलेले शैलेश स्वामी, शिवसेनेचे रवी सुडे, गोरोबा गाडेकर यांच्या पत्नी शकुंतला गाडेकर, काँग्रेसचे सुरेश पवार, ज्योती आवसकर या विद्यमान नगरसेवकांना तिकीट दिले असून, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेमधून भाजपावासी झालेले माजी आ़ शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे चिरंजीव अजित पाटील कव्हेकर, अ‍ॅड़ शफी सय्यद, अजय कोकाटे, रागिणी यादव, राजकुमार आकनगिरे, पठाण फिरोज, विद्यासागर शेरखाने, हनुमान नामदेव जाकते, सुनील किशनराव मलवाड, गौरव मदने तसेच शिवसेनेचे धनराज साठे यांनाही उमेदवारी दिली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसमधील संगीत रंदाळे, अर्चना आल्टे यांनाही भाजपाची उमेदवारी मिळाली आहे़ भारतीय जनता पार्टीने एकूण ६६ ठिकाणी उमेदवार दिले असून, प्रभाग क्र. ७ मधील चारही जागा रिपाइं (आठवले गट) ला सोडल्या आहेत. दरम्यान, लोकसभेसाठी काँग्रेस सोडलेल्या मोहन माने यांनी प्रभाग क्र. ३ मधून भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना भाजपाने डावलले आहे.
काँग्रेस पक्षाने विद्यमान उपमहापौर चाँदपाशा घावटी, स्थायी समितीचे माजी सभापती अ‍ॅड. समद पटेल, रामभाऊ कोंबडे, गटनेते नरेंद्र अग्रवाल, प्रभाग समितीच्या सभापती केशरबाई महापुरे यांच्यासह २७ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले असून, विद्यमान महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, गटनेते रविशंकर जाधव, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती पप्पू देशमुख, नगरसेवक उषाबाई कांबळे, अहेमदखाँ पठाण, पूजा पंचाक्षरी, युनुस मोमीन, शाहेदाबी शेख, किशोर राजुरे, सपना किसवे, उर्मिला बरूरे, शशिकला यादव, योजना कामेगावकर, पंडित कावळे, कविता वाडीकर, रविशंकर जाधव, प्रा. राजकुमार जाधव, लक्ष्मण कांबळे, अनुप मलवाडे, रमेशसिंह बिसेन, गिरीश पाटील, असगर पटेल, अंजली चिंताले यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
राकाँचे विद्यमान नगरसेवक मकरंद सावे, राजा मणियार, विनोद रणसुभे, राजेंद्र इंद्राळे, दीपाली इंद्राळे, इर्शाद तांबोळी या सहा जणांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीने ४९ नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

Web Title: 397 candidates in municipal akhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.