काँग्रेस-शिवसेना युती १८ जागांसाठी ३९ उमेदवार

By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:21:51+5:302016-07-01T00:33:25+5:30

फुलंब्री : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दोन पॅनल असून, यात तीन अपक्षांचा समावेश आहे.

39 seats for Congress-Shiv Sena alliance 18 seats | काँग्रेस-शिवसेना युती १८ जागांसाठी ३९ उमेदवार

काँग्रेस-शिवसेना युती १८ जागांसाठी ३९ उमेदवार


फुलंब्री : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दोन पॅनल असून, यात तीन अपक्षांचा समावेश आहे.
३० जून उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख होती. या तारखेला एकूण ९४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट काँग्रेससोबत, तर दुसऱ्या गटाचा डोळा भाजपवर असल्याचे वृत ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. हे वृत्त खर ठरले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण चव्हाण हे स्वत: निवडणूक लढवीत असून, त्यांना भाजपने पाच जागा दिल्या आहेत.
सोसायटी मतदारसंघ : ११ जागांसाठी २२ उमेदवार : शिवाजीराव पाथ्रीकर, गोविंद वाघ, बाबासाहेब तायडे, रामेश्वर गाडेकर, संदीप बोरसे, राहुल डकले, विजय मोरे, अशोक पवार, चंद्रकांत जाधव, राजेश सोटम, कृष्णा गावंडे, महादू डकले, भाऊसाहेब पांडे, अशोक गाडेकर, केशरबाई वाळके, कांताबाई जाधव, मंगलाबाई वाहेगावकर, कौशल्याबाई काळे, विठ्ठल लुटे, एकनाथ धाटीग, काशीनाथ भारती, नामदेव काळे.
ग्रामपंचायत मतदारसंघ : ४ जागांसाठी ९ उमेदवार : सर्जेराव मेटे, छायाबाई भिवसने, संगीता मेटे, कल्याण चव्हाण, सुभाष गायकवाड, रोशन अवसरमल, रमेश गायकवाड, बाळासाहेब तांदळे, विद्या शिंदे. व्यापारी मतदारसंघ : २ जागांसाठी ४ उमेदवार : राजेंद्र ठोंबरे, रवींद्र काथार, रत्नाकर म्हस्के, मातीन पटेल. हमाल मापाडी मतदारसंघ : एका जागेसाठी ४ उमेदवार शेख वासीम, जमीर पठाण, रावसाहेब म्हस्के, प्रभाकर सोटम.
काँग्रेस -शिवसेना यांनी या निवडणुकीला युती केली असून, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे हे व्यापारी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असून, त्यांना काँग्रेस पक्षाने चार जागा दिल्या आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा गटही काँग्रेस पक्षासोबत आहे.

Web Title: 39 seats for Congress-Shiv Sena alliance 18 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.