शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

३७५ कोटींची कामे केली रद्द..!

By admin | Updated: January 22, 2015 00:44 IST

बीड : जिल्हा परिषदेमध्ये वित्त आयोग, बांधकाम विभागामध्ये तरतूद नसतानाही कोट्यावधी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता बहाल करण्यात आल्या होत्या़

बीड : जिल्हा परिषदेमध्ये वित्त आयोग, बांधकाम विभागामध्ये तरतूद नसतानाही कोट्यावधी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता बहाल करण्यात आल्या होत्या़ चौकशी समितीनेही आक्षेप नोंदविला होता़ सीईओ नामदेव ननावरे यांनी बुधवारी सुमारे पाऊणे चारशे कोटी रूपयांची कामे रद्द करत जोरदार दणका दिला़तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी जिल्हा परिषदेचा स्वत:चा निधी, जिल्हा नियोजन समिती, वित्त आयोगामार्फत निधीची उपलब्धता नसताना कोट्यवधी रुपयांचा प्रशासकीय मान्यता दिलेल्या होत्या़ विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेतली नव्हती़ याबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या समितीने चौकशी केली होती़ या समितीने केलेल्या चौकशीमध्ये उपलब्ध निधीपेक्षा हजार टक्के अधिक कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा निर्वाळा दिला़ या सर्व प्रशासकीय मान्यता नियमबाह्य असल्याचा ठपकाही ठेवला होता़ मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता झाल्याचे हे प्रकरण नंतर अधिकाऱ्यांच्याच अंगलट आले होते़ सीईओ राजीव जवळेकर यांची उचलबांगडी करण्यात आली़ कॅफो वसंत जाधवर यांच्यावर कार्यमुक्तीची नामुष्की ओढावली होती़सीईओ नामदेव ननावरे यांनी चौकशी अहवालात नमूद बाबींच्या अनुषंगाने माहिती घेतली़ त्यानुसार बेकायदेशीर प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची वर्गवारी करून नियमबाह्य कामे रद्दचे आदेश दिले़ त्यामुळे विविध कामांसाठी निधी नसतानाही प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या पदाधिकाऱ्यांनाही जोरदार चपराक बसली आहे़ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या मात्र प्रत्यक्ष सुरूवात न झालेल्या कामांचा यात समावेश आहे़दरम्यान, नियमबाह्य कामांमुळे गाजत असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या विशेष लेखा परीक्षण सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर सीईओंनी काढलेल्या कामे रद्दच्या आदेशामुळे एकच खळबळ उडाली आहे़ उपलब्ध निधीपेक्षा जास्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या काही कामांची देयके यापूर्वीच अदा केली आहेत़ तरतूद नसल्यामुळे नंतर देयके अदा करता येणार नाहीत़ त्यामुळे सुरू न झालेली कामे रद्द केली असली तरी नियमबाह्य कामांच्या अदा केलेल्या देयकाचे काय ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ (प्रतिनिधी)